शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 11:27 IST

Brijbhushan Sharan Singh News: जातीय विभागणीच्या राजकारणामुळे समाजात फूट पडली, असे बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.

Brijbhushan Sharan Singh News: तुम्ही हवे तर आणखी १७५ वर्षे आरक्षण घ्या. परंतु, आम्हाला याची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही अनेक पारंपरिक समुदाय अजूनही विकासापासून दूर आहेत, असे भाजपा नेते बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे. परशूराम जयंतीच्या निमित्ताने अयोध्येत आयोजित एका कार्यक्रमात बृजभूषण सिंह बोलत होते. 

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आरक्षणाच्या प्रभावावर बृजभूषण सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्या संबोधनात मंडल आयोगाचा विशेष उल्लेख केला. या आयोगामुळे काही समाजांना फायदा झाला असला तरी, कुंभार, सुतार आणि तेल व्यावसायिक यांसारख्या पारंपरिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या समाजांना अजूनही अपेक्षित विकास साधता आलेला नाही. देशात आरक्षण पद्धती लागू असली तरी समाजाचा एक मोठा वर्ग मागे राहिला आहे. आर्थिकदृष्ट्या सशक्त वर्ग आणि मागे पडलेले वर्ग यांच्यातील दरीवर गंभीर चिंतन करण्याची गरज असल्याचे बृजभूषण सिंह यांनी अधोरेखित केले.

जातीय विभागणीच्या राजकारणामुळे समाजात फूट पडली

संविधानाच्या निर्मितीवर बृजभूषण सिंह यांनी भाष्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह २४२ खासदारांनी मिळून संविधान तयार केले होते. जातीय विभागणीच्या राजकारणामुळे समाजात फूट पडली आहे. मी कोणत्याही समाजाचे विरोधक नाही, परंतु, समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळण्याला समर्थन देतो, असेही ते म्हणाले. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम हे 'समाजसेवक' असल्याचे सांगत सिंह यांनी त्यांचे स्मरण केले. 

दरम्यान, सामाजिक संतुलन राखणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे बृजभूषण सिंह यांनी अधोरेखित केले. या वक्तव्यामुळे आरक्षण आणि जातीय राजकारणावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Brijbhushan Singh: 'Take 175 Years Reservation,' Targets Whom?

Web Summary : Brijbhushan Sharan Singh questions reservation's impact after 75 years of independence. He highlights the need to address the gap between economically strong and backward classes, advocating for equal opportunities for all, irrespective of caste.
टॅग्स :brij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण