भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी किआ इंडियाने एक कार आणली होती. थोडीशी वॅगनआरसारखी थोडीशी स्कोडाच्या जुन्या येतीसारखी दिसणारी ही कार काही केल्या ग्राहकांना खेचू शकली नाही. सेल्टॉस आणि सोनेटने कियाला भारतीय बाजारात पाय रोवण्यास मदत केली परंतू किया सिरॉसने मात्र कियाचा भ्रमनिरास केला. हीच कार कियाने पुन्हा नव्याने लाँच केली आहे. यावेळी कियाने नव्या मॉडेलची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा २७,००० रुपयांनी कमी ठेवली आहे.
नवीन सिरॉसमध्ये स्पोर्टी फ्रंट बंपर, नवीन LED फॉग लॅम्प्स, ग्लॉसी ब्लॅक स्किड प्लेट्स आणि रूफ रेल्स देण्यात आल्या आहेत. हाय-एंड व्हेरियंट्समध्ये (HTX) १७-इंच क्रिस्टल कट अॅलॉय व्हील्स आणि आकर्षक निऑन कलरचे ब्रेक कॅलिपर दिले आहेत. यात ३०-इंच 'ट्रिनिटी' पॅनोरामिक डिस्प्ले, ड्युअल पेन सनरुफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि हरमन कार्डन साउंड सिस्टम मिळते. मॅग्मा रेड, आयव्हरी सिल्वर मॅट आणि आयव्हरी सिल्वर ग्लॉस असे तीन नवीन रंग पर्याय सादर केले आहेत.
जुन्या Kia Syros ला Bharat NCAP कडून ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे ती तिच्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कारपैकी एक ठरली आहे. तरीही ग्राहकांनी तिच्याकडे पाठ फिरविली होती.
२०२६ Kia Syros ची सुरुवातीची किंमत ₹८.३९ लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये HTE, HTE(O), HTK+(O) आणि HTX(O) हे नवीन व्हेरियंट्स जोडले आहेत. आता HTK+ व्हेरियंटपासून डिझेल ऑटोमॅटिकचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे ऑटोमॅटिक कार घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही SUV अधिक परवडणारी झाली आहे. यात १६ स्वायत्त सुरक्षा फीचर्ससह ADAS लेव्हल २ तंत्रज्ञान मिळते. ६ एअरबॅग्स (स्टँडर्ड), ३६०-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर आणि ESC (इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल) यांसारखी महत्त्वाची सुरक्षा वैशिष्ट्ये यात आहेत.
Web Summary : Kia relaunched the Syros with a price cut and added features hoping to boost sales. The updated model features cosmetic changes, new variants, and enhanced safety features. Despite a 5-star safety rating, the previous model struggled to attract buyers. The starting price is ₹8.39 lakh.
Web Summary : किआ ने बिक्री बढ़ाने के लिए कीमत में कटौती और अतिरिक्त सुविधाओं के साथ सिरोस को फिर से लॉन्च किया। अपडेटेड मॉडल में कॉस्मेटिक बदलाव, नए वेरिएंट और बेहतर सुरक्षा सुविधाएँ हैं। 5-स्टार सुरक्षा रेटिंग के बावजूद, पिछला मॉडल खरीदारों को आकर्षित करने के लिए संघर्ष कर रहा था। शुरुआती कीमत ₹8.39 लाख है।