जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात एक बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. रामनगरजवळील कनोते गावाजवळून बस जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उंचावरील डोंगराळ रस्त्यावरून जात असताना एका वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बस उधमपूरच्या दिशेने जात असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या घटनेवर मनोज सिन्हा यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मी शोक व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो."
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही या घटनेबाबत 'एक्स' वर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं, "मी उधमपूरचे डेप्युटी कमिशनर मिंगा शेरपा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी माहिती दिली की बचावकार्य वेळेत सुरू करण्यात आले असून जखमींना योग्य उपचार दिले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच मी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधला."
केंद्रीय मंत्र्यांनी पुढे असंही सांगितलं की, गंभीर जखमींना उपचारासाठी 'एअरलिफ्ट' (विमानाने नेणे) केलं जाऊ शकते, जेणेकरून त्यांना जम्मू-काश्मीरबाहेरील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळतील. हा अपघात इतका भीषण होता की जखमींची संख्या आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण बहुतांश जखमींची प्रकृती गंभीर आहे.
जितेंद्र सिंह यांनी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनाही मदतीसाठी घटनास्थळी पाठवले आहे. भाजपा नेते राजिंदर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते तेथे पोहोचले आहेत. जखमींच्या उपचारात कोणतीही विलंब होऊ नये यासाठी आपण स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
Web Summary : A bus accident in Udhampur, Jammu & Kashmir, resulted in 15 fatalities and numerous injuries. The bus veered off a mountain road near Kanote village. Rescue operations are underway, with seriously injured individuals being hospitalized. Officials are providing assistance.
Web Summary : जम्मू-कश्मीर के उधमपुर जिले में एक बस दुर्घटना में 15 लोगों की मौत हो गई और कई घायल हो गए। रामनगर के पास कनोते गांव में बस खाई में गिर गई। बचाव कार्य जारी है और घायलों को अस्पताल पहुंचाया जा रहा है।