NCP MP Parth Pawar:बारामतीत सांगता सभेच्या स्थळाची पाहणी सुरू आहे. सांगता सभा होणार आहे. इथे ऊन खूप आहे. राज्यभरातून अनेक लोक इथे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. आम्हाला २ लाख ७० हजारांचा रेकॉर्ड मोडायचा आहे, असा निर्धार अजित पवार राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी व्यक्त केला.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच पार्थ पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. ऊन खूप आहे. उन्हात लोकांना कसे बाहेर काढायचे हा एक मोठा टास्क आहे. आम्ही चांगल्या मतांनी तर शंभर टक्के निवडून येणार आहोत, असे पार्थ पवार म्हणाले.
बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती
अनेक लोकांची इच्छा होती की, बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. परंतु, निवडणूक बिनविरोध झालेली नाही. काही लोक जे उभे राहिले आहेत, त्यांच्या अनेक मागण्या होत्या. काही प्रतिस्पर्धी उमेदवारांना मुद्दाम उभे केले आहे, असे सूचक विधान पार्थ पवार यांनी केले आहे.
दरम्यान, काही लोकांनी उमेदवारांना मुद्दाम उभे केले. आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. उन्हात मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले.
Web Summary : Parth Pawar anticipates Sunetra Pawar's victory in Baramati by a large margin, regretting the election wasn't uncontested. He acknowledges challenges in mobilizing voters due to heat.
Web Summary : पार्थ पवार को बारामती में सुनेत्रा पवार की बड़ी जीत की उम्मीद है, लेकिन चुनाव निर्विरोध न होने का उन्हें अफसोस है। उन्होंने गर्मी के कारण मतदाताओं को जुटाने में चुनौतियों को स्वीकार किया।