शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:30 IST

Gurupushyamrut Yoga 2026:२३ एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग आहे, आयुष्याला सोन्याची झळाळी मिळेल एवढे बळ या योगात आहे, त्याचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊ. 

अध्यात्मिक प्रगती, उपासना आणि कोणत्याही शुभ कार्याचा श्रीगणेशा करण्यासाठी २३ एप्रिल २०२६ रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे, तो म्हणजे 'गुरुपुष्यामृत योग'. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा गुरुवारी शनीचे पुष्य नक्षत्र येते, तेव्हा या अमृततुल्य योगाची निर्मिती होते. ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित लिहितात, की या सुवर्ण योगावर केवळ सोनेखरेदीला नाही तर अध्यात्मिक विकासालाही महत्त्व द्या. तसे का? याबद्दल त्यांनी पुढे सविस्तर समजावून सांगितले आहे. 

हे ही वाचा : Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?

शनी आणि गुरु: दोन बलाढ्य ग्रहांचा मिलाफ

हा योग शनी आणि गुरु या दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला आहे. हे दोन्ही ग्रह साधक आणि उपासक मानले जातात, परंतु त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती भिन्न आहेत:

गुरु: हा ग्रह आपल्याला प्रापंचिक जीवन जगताना धर्माचे पालन करण्यास आणि कर्तव्यांनंतर परमार्थाकडे वळण्यास शिकवतो. गुरूची सेवा अफाट फळ देणारी असते.

शनी: शनी हा शिस्तप्रिय, कडक आणि न्यायी सखा आहे. तो कर्माचा कारक असून आपली प्रत्येक क्षणी परीक्षा घेतो, जेणेकरून आपण आतून घडावे.

गुरुपुष्य योगावर 'साधना' महत्त्वाची का?

या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे, परंतु केवळ भौतिक सोन्यापेक्षा आपल्या आयुष्याला सोन्यासारखे तेज मिळवून देण्यासाठी साधना करणे अधिक आवश्यक आहे.

पारायण आणि ग्रंथवाचन: दासगणू महाराजांनी 'श्री गजानन विजय' ग्रंथात या योगाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जो भक्त या दिवशी अनन्यभावे या पोथीचे पारायण करेल, त्याच्या सर्व यातनांचे निरसन होऊन मनोकामना पूर्ण होतात, अशी ग्वाही स्वतः महाराजांनी दिली आहे.

हे ही वाचा : Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

जप आणि संकल्प: या दिवशी केलेले जप, तप, ध्यान आणि संकल्प अनेक पटीने वृद्धिंगत होतात. विशेषतः श्री महालक्ष्मीची साधना या दिवशी विशेष फलदायी ठरते.

दानधर्म: शक्य असल्यास सोने खरेदी करावे, अन्यथा चण्याची डाळ घरी आणावी. गरिबांना गूळ आणि गहू दान केल्यास पुण्यप्राप्ती होते.

काय करावे आणि काय टाळावे?

शुभ कार्ये (काय करावे)वर्ज्य कार्ये (काय टाळावे)
नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा गुंतवणुकीचा श्रीगणेशा.विवाह: हा योग विवाहासाठी वर्ज्य मानला जातो.
नामस्मरण, ग्रंथ पारायण आणि ध्यान धारणा.नवीन वैवाहिक आयुष्याची सुरुवात या दिवशी करू नये.
धार्मिक ग्रंथांचा संकल्प करून वाचन करणे.नकारात्मक विचार किंवा आळस टाळावा.
अडकलेली किंवा बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करणे.कोणाशीही अन्यायकारक किंवा कठोर वागणे.

कर्माचा आणि ईश्वराचा संगम

पुष्य नक्षत्र हे 'पोषण' करणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण आपल्या अंगी बाणवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने 'गुरुपुष्य' साजरा करणे होय. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" या उक्तीनुसार, प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी या प्रभावी योगावर केलेली उपासना मनुष्याला नक्कीच तारून नेते.

हे ही वाचा : Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

प्रार्थना: आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा गुरुपुष्य योग एका नवीन सोनेरी किरणांची पहाट घेऊन येणारा ठरो, हीच शनी आणि गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना!

English
हिंदी सारांश
Web Title : Guru Pushyamrut Yoga 2026: Spiritual growth and auspicious beginnings explained.

Web Summary : Guru Pushyamrut Yoga on April 23, 2026, is auspicious for spiritual progress. While gold purchase is traditional, focus on spiritual practices, scripture reading, and charity. Avoid marriages and negative thoughts. It's a union of karma and divine grace.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिक