शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
4
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
5
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
6
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
7
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
8
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
9
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
10
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
11
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
12
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
13
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
14
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
15
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
16
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
17
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
18
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
19
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
20
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:48 IST

दरम्यान प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नाही तर अनेक प्रवासी रडत-रडत देवाकडे प्रार्थनाही करू लागले होते.

हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या 'फ्लाई९१' (Fly91) एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा आपघात थोडक्यात टळला आहे. या विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे हे विमान तब्बल चार तास हवेतच घिरट्या घालत होते. दरम्यान प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नाही तर अनेक प्रवासी रडत-रडत देवाकडे प्रार्थनाही करू लागले होते.

नेमके काय घडले? -फ्लाईट IC3401 ने रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हुबळीसाठी उड्डाण केले. नियोजित वेळेनुसार हे विमान सायंकाळी ४:३० वाजता हुबळीला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, विमान हुबळीजवळ पोहोचताच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे वैमानिकांनी लँडिंग न करता, सुरक्षित लँडिंगची तयारी करण्यासाठी हवेतच विमानाच्या घिरट्या घालण्याचा निर्णय घेतला.

प्रवासी भयभीत, नातलगांचा संताप - सुमारे चार तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा परिसरात हवेतच घिरट्या घालत होते. दरम्यान विमानात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रवासी प्रचंड भयभीत झाले होते. तर अनेक जण रडत-रडत देवाला प्रार्थना करत होते. याशिवाय, प्रवाशांच्या नातलगांनीही एअरलाइन्सवर संताप व्यक्त केला. एअरलाइन्सकडून वेळेवर आणि स्पष्ट माहिती दिली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अखेर बेंगळुरूमध्ये सुरक्षित लँडिंग, प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला  -अखेर, हे विमान बेंगळुरूकडे वळवण्यात आले आणि सायंकाळी ७:३० च्या सुमारास केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. या यशस्वी लँडिंगनंतर प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे एअरलाइन्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fly91 flight faces technical snag, passengers pray during 4-hour ordeal.

Web Summary : A Fly91 flight from Hyderabad to Hubli narrowly avoided disaster after a technical fault forced it to circle for four hours. Passengers panicked, praying for safety. The flight eventually landed safely in Bengaluru, sparking relief but raising safety concerns.
टॅग्स :airplaneविमानpassengerप्रवासीBengaluruबेंगळूरAccidentअपघात