शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:58 IST

West Bengal Assembly Elections: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी मतदानापूर्वी राज्यातील मतदार यादीत सुमारे ७ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या वाढीव मतदारसंख्येमुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी आयोगाने या मतदारांचे सखोल तपशील जाहीर केलेले नाहीत.

सात लाख नवीन मतदारांपैकी सुमारे ३.२२ लाख मतदार पहिल्या टप्प्यात आपला मतदानाचा हक्क बजावतील. उर्वरित ३.८८ लाख मतदार दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पात्र आहेत. या नवीन नोंदणीमुळे राज्यातील एकूण मतदारांची संख्या आता ६ कोटी ८२ लाख ५१ हजार ८ इतकी झाली आहे. बंगालमधील सत्तासंघर्ष पाहता, या सात लाख नवीन मतदारांचा कल कोणाकडे असेल, यावर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषतः तरुणांची आणि महिलांची संख्या किती आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराची दिशा अधिक स्पष्ट होऊ शकते. 

सविस्तर माहितीअभावी निर्माण झाला संभ्रम 

आयोगाने एकूण आकडेवारी जाहीर केली असली, तरी यामध्ये १८ वर्षे पूर्ण झालेले प्रथमच मतदान करणारे किती आहेत, याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. तसेच, नवीन मतदार नोंदणी अर्ज किती प्राप्त झाले होते व त्यापैकी किती अर्ज फेटाळण्यात आले, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही. यावर निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, "नियम व निकषांनुसार एकूण आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सविस्तर माहिती  आवश्यकतेनुसार ती नंतर सामायिक केली जाऊ शकते."

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal adds 7 lakh new voters; Politics to change?

Web Summary : West Bengal's voter list expands by 7 lakhs before elections. 3.22 lakhs vote in the first phase. Total voters reach 6.82 crores. Political parties are watching which way these new voters will swing, especially youth and women.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026Votingमतदान