शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 11:41 IST

आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास आणि अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एएनआरएफ) यांच्या नावांचा वापर करून देशभरातील विद्यापीठांना कोट्यवधींचे आमिष दाखविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास आणि अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एएनआरएफ) यांच्या नावांचा वापर करून देशभरातील विद्यापीठांना कोट्यवधींचे आमिष दाखविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नामांकित संस्थांशी संलग्नता असल्याचे भासवून विद्यापीठांना कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दिले जात आहे. त्यासाठी आगाऊ तब्बल ६० लाख रुपयांची मागणी केली जात आहे. त्यातून शिक्षण संस्थांची फसवणूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

याबाबत आयसीटी मुंबईचे माजी संचालक प्रा. जी. डी. यादव यांनी शिक्षण संस्थांना खबरदारी बाळगण्याचा इशारा दिला असून, अशारीतीने कोणी संपर्क साधल्यास त्या भूलथापांना बळी न पडण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय मानांकनात वरचे स्थान मिळवण्यासाठी अनेक खासगी विद्यापीठे आयआयटीसारख्या संस्थांशी भागीदारी करण्यास उत्सुक असतात. याचाच फायदा घेत भामटे थेट विद्यापीठाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी संपर्क साधतात.

गेल्या वर्षी झाली होती अडीच कोटींची फसवणूक आयआयटी किंवा सरकारी संस्था अनुदान देण्यासाठी आगाऊ पैशांची मागणी करत नाहीत. माझ्याकडेही अशाच प्रकारची विचारणा झाली होती, मात्र आयआयटी मुंबईमधील परिचितांकडे खातरजमा केली असता हा सर्व प्रकार बनावट असल्याचे उघड झाले, अशी माहिती आयसीटी मुंबईचे माजी संचालक प्रा. जी. डी. यादव यांनी दिली. तसेच गेल्यावर्षी अशाच प्रकारे एका खासगी विद्यापीठाला १०० कोटींच्या अनुदानाचे आमिष दाखवून तब्बल अडीच कोटी रुपयांना गंडा घातल्याची माहितीही त्यांनी दिली. 

मोडस ऑपरेंडी काय 

फसवणूक करणारी व्यक्ती नामांकित संस्थांशी संलग्न असल्याचे भासवून विद्यापीठांना साधारण २४ कोटी रुपये मूल्याच्या दोन संशोधन प्रकल्पांमध्ये भागीदार होण्याची ऑफर देत आहे. हे प्रकल्प सरकारी अनुदानावर आधारित असल्याचे सांगून ही भागीदारी निश्चित करण्यासाठी एकूण प्रकल्पाच्या २.५ टक्के रक्कम तातडीने एका एस्क्रो खात्यात जमा करण्यास सांगितले जाते. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवार-रविवारचा वेळ निवडून ‘डेडलाइन’ची भीती घातली जाते, असेही यादव यांनी नमूद केले. शिवाय अधिकृत ईमेल आयडीऐवजी खासगी ईमेल करणे, प्रकल्पासाठी आगाऊ रकमेची मागणी, व्यवहार पूर्ण करण्यासाठी टोकाची घाई दाखवली जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : IIT Name Used in Multi-Crore Fraud; Education Institutes Warned

Web Summary : Universities are being lured with crores by fraudsters posing as IIT affiliates, demanding advance payments for projects. ICT's ex-director warns institutions to be cautious, citing a past 2.5 crore fraud involving a fake grant.
टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र