By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 08:08 IST
1 / 11Gajakesari Rajyoga April 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला विशेष महत्त्व आहे. चंद्र ग्रह दर अडीच ते तीन दिवसांनी रास एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतो. चंद्राच्या बदलत्या स्थितीचा परिणाम सर्व राशींवर होतो. मन, भावना आणि मानसिक शांतता, स्मृती, आनंद, समृद्धीचा कारक चंद्र ग्रह मानला जातो. 2 / 11२१ एप्रिल रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करत आहे. भाग्यकारक गुरु ग्रह मिथुन राशीत विराजमान आहे. परिणामी, गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी नावाचा राजयोग तयार होत आहे. यामुळे काही राशींना बहुतांश कामांमध्ये यश, आदर, पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते, असे म्हटले जात आहे.3 / 11२१ एप्रिल रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल आणि २३ एप्रिलपर्यंत तेथेच राहील. या काळात गजकेसरी राजयोग अंदाजे ५४ तास असेल. गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे जीवनात आनंद येऊ शकतो. संपत्ती, बुद्धिमत्ता, विविध क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. या योगाच्या प्रभावामुळे त्यांच्या नेतृत्व क्षमतेत वाढ होते, असे मानले जाते. जाणून घेऊया...4 / 11मेष: हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारू शकते. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. शिवाय, गुंतवणुकीतून भरीव नफा मिळू शकतो.5 / 11वृषभ: आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ कामगिरीने प्रभावित होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. वरिष्ठांकडून पाठिंबाही मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. नफ्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यवसाय नवीन उंची गाठू शकतो. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे.6 / 11मिथुन: जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. मानसिक ताण कमी होईल. सकारात्मक ऊर्जा वाढेल. निर्णयक्षमता सुधारेल. या अनुकूल ऊर्जेमुळे विवाह, संतती आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. एकाग्रता वाढेल आणि संशोधनात सहभागी असलेल्या व्यक्तींना चांगले यश मिळण्याची चिन्हे आहेत.7 / 11सिंह: मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. एक मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होईल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. नोकरदार व्यक्तींना विशेष लाभ, करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. या काळात अध्यात्माकडे असलेला कलही वाढू शकतो. घर, वाहन खरेदी करण्याची स्वप्नेही पूर्ण होऊ शकते.8 / 11कन्या: करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यशाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. मेहनतीला सकारात्मक फळ मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ अनुकूल असेल. नवीन प्रकल्प, सौदे किंवा व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांना एक विश्वासार्ह व फायदेशीर भागीदार मिळू शकेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठीही अतिशय फलदायी ठरेल.9 / 11धनु: प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश आणि भरीव आर्थिक लाभ मिळू शकतो. विरोधकांमुळे निर्माण झालेला तणाव कमी होईल. प्रतिस्पर्धकांवर लक्षणीय आघाडी मिळवता येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ असू शकतो. कुटुंबात शांतता व आनंदाचे वातावरण नांदेल. कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे.10 / 11कुंभ: अनेक प्रकारे हा काळ विशेष ठरू शकतो. जीवनात आनंद येईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. संपत्तीत वाढ होऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या परिस्थितीत, भविष्यासाठी बचत करू शकाल.11 / 11- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.