अनिकेत घमंडी, डोंबिवली: मध्य रेल्वेच्या (Central Railway) एका रिकाम्या लोकलचे (एम्प्टी रेकचे) चाक डोंबिवली स्थानकात (Dombivli Railway station) रुळावरून घसरल्याची (Train Derail) घटना सोमवारी सकाळी साधारण ८ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास घडली. लोकलमध्ये कुणीच नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण त्या अपघातामुळे डाऊन स्लो वाहतूक दिवा-कल्याण मार्गावर ठप्प झाली होती. दुरुस्तीचे काम करण्यात येत असून या अपघातामुळे डाऊन, अप चारही मार्ग प्रभावित झाले असून लोकल गाड्या २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत.
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून कसा घसरला?डोंबिवली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून कल्याणकडे जाणाऱ्या एका लोकल गाडीचे चाक ट्रॅकवरून घसरले घटना घडली. या घटनेमुळे त्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या एकामागोमाग उभ्या राहिल्या असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेनंतर तात्काळ रेल्वे प्रशासन आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ही लोकल ट्रेन (Local Train) कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात होती. ही ट्रेन रिकामी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही, पण या घटनेचा परिणाम लोकल सेवेवर झाला.
नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी सकाळच्या ऑफिसच्या वेळेत हजारो प्रवाशांना उशीर होत असल्याने स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. यामुळे काही स्लो लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून वळविण्यात येत आहेत, जेणेकरून सेवा काही प्रमाणात सुरळीत ठेवता येईल. तरीही गाड्यांचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणावर कोलमडले. सकाळी ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याने पुढील काही तास प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
Web Summary : An empty local train derailed at Dombivli station Monday morning, disrupting down slow traffic on the Diva-Kalyan route. No casualties were reported. Repairs are underway, but all lines are affected, causing delays of 20-30 minutes.
Web Summary : डोंबिवली स्टेशन पर सोमवार सुबह एक खाली लोकल ट्रेन पटरी से उतर गई, जिससे दिवा-कल्याण मार्ग पर डाउन धीमी यातायात बाधित हो गया। कोई हताहत नहीं हुआ। मरम्मत जारी है, लेकिन सभी लाइनें प्रभावित हैं, जिससे 20-30 मिनट की देरी हो रही है।