Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता

By देवेंद्र जाधव | Updated: April 19, 2026 23:06 IST

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte: १०० दिवसांच्या खेळाला आज पूर्णविराम लागला. तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांनी तन्वीच विजयी होणार, असा अंदाज लावला होता. आता प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला असं म्हणता येईल.

Tanvi Kolte Wins BBM6: आज 'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले पार पडली. १०० दिवसांच्या खेळाला आज पूर्णविराम लागला. तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांनी तन्वीच विजयी होणार, असा अंदाज लावला होता. आता प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला असं म्हणता येईल. 'बिग बॉस मराठी ६'च्या ट्रॉफीवर तन्वी कोलतेने नाव कोरलं आहे. तन्वीला विजयी रक्कम म्हणून १५ लाख रुपये मिळाले आहेत. तन्वी झाली 'बिग बॉस मराठी ६' ची महाविजेतीतन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात अभिनेता आयुष संजीवसोबत आली होती. आयुष आणि तन्वीची वाढती मैत्रीही चर्चेत ठरली. तन्वीला त्यावरुन घरातल्या लोकांची टीका सहन करावी लागली. सुरुवातीपासूनत जिथे अन्याय दिसतो तिथे तन्वीने आवाज उठवला.

याशिवाय इतर सदस्यांसोबत तन्वीचं प्रेमळ नातंही बघायला मिळालं. प्रभू शेळके आणि तन्वीची मैत्री चांगलीच गाजली. तन्वी ही या सीझनमधील एकमेव स्पर्धक होती जी २ वेळा कॅप्टन राहिली आहे. ग्रँड फिनालेमध्ये असलेल्या राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, दिपाली सय्यद या टॉप ४ स्पर्धकांपेक्षा वरचढ ठरत तन्वी जिंकल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला असून अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे.तन्वी कोलतेला प्राईज मनी म्हणून तब्बल १५ लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय 'बिग बॉस मराठी ६'च्या चमचमत्या ट्रॉफीवर तन्वीने स्वतःचं नाव कोरलं आहे. तन्वी कोलते ही अभिनेत्री असून लक्ष्मी निवास या मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली. 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सुरुवातील तन्वीला तिच्या स्वभावामुळे रितेश देशमुखचा ओरडा खावा लागला. परंतु नंतर स्वभाव बदलून आणि चांगला खेळ खेळून आज तन्वी 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली आहे. तन्वीचे कुटुंबीय, तिचे मित्र-मैत्रिणी आणि असंख्य फॅन्स आज आनंदात असतील यात शंका नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Tanvi Kolte Wins 'Bigg Boss Marathi 6'; Rakesh Bapat Runner-Up

Web Summary : Tanvi Kolte won 'Bigg Boss Marathi 6', securing ₹15 lakh and the trophy. She overcame challenges and criticism to emerge victorious over other contestants, including Rakesh Bapat. Her journey, marked by friendships and standing against injustice, resonated with viewers.
टॅग्स :तन्वी कोलतेबिग बॉस मराठी ६रितेश देशमुखकलर्स मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार