विजयकुमार सैतवाललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव: सोने-चांदीच्या वाढलेल्या किमतींची तमा न बाळगता साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला ग्राहकांनी खरेदीचा आनंद लुटला. या एकाच दिवसात महाराष्ट्रात १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल झाली. लग्नसराईची खरेदीही या मुहूर्तावर करण्यात आली आहे.
मुंबईत ७०७२ वाहनांची विक्रमी नोंद
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गाडी दारात यावी यासाठी ९ दिवसांत मुंबईत तब्बल ७०७२ वाहनांची नोंदणी झाली. यात दुचाकींचे प्रमाणही मोठे आहे. सकाळपासूनच शोरूमबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. यंदा विविध वाहन कंपन्यांनी आकर्षक सवलती, एक्सचेंज ऑफर्स, कमी डाउन पेमेंट, तसेच सुलभ कर्जयोजना उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांचा कल वाहन खरेदीकडे वाढला आहे.
कोणत्या दागिन्यांना मिळाली पसंती?
अनेकांनी जुने दागिने देऊन त्यात भर घालून नवीन खरेदी केली. तसेच नवीन दागिने घेताना हलक्या वजनाच्या दागिन्यांसह शिक्के, वेढे यांची खरेदी करण्यात आली.
Web Summary : Despite high prices, Akshay Tritiya saw ₹1,000 crore in gold sales in Maharashtra. Mumbai recorded 7,072 vehicle registrations. Lightweight jewelry and coins were popular purchases.
Web Summary : महंगाई के बावजूद, अक्षय तृतीया पर महाराष्ट्र में ₹1,000 करोड़ की सोने की बिक्री हुई। मुंबई में 7,072 वाहन पंजीकृत हुए। हल्के आभूषणों और सिक्कों की खूब खरीदारी हुई।