पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात लखनौच्या ताफ्यातील एडन मार्करमची चांगलीच धुलाई झाली. प्रियांश आर्य आणि कूपर कॉलॉनी या जोडीनं त्याच्या एका षटकात ३२ धावा कुटल्या. लखनौच्या संघाकडून एका षटकात सर्वाधिक धावा खर्च करण्यासह IPL च्या इतिहासात एका षटकात ५ षटकार देण्याचा लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावे झाला.
२०१२ च्या हंगामात राहुल शर्मानं पुणे वॉरियर्स इंडियाकडून आरसीबीविरुद्धच्या सामन्यात एका षटकात ५ षटकार दिल्याचा रेकॉर्ड आहे.
२०२० च्या हंगामात शेल्डन कॉट्रेल याने पंजाब किंग्सच्या ताफ्यातून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात एका षटकात पाच षटकार खाल्ले होते.
२०२१ च्या हंगामात RCB च्या ताफ्यातून खेळताना हर्षल पटेलची धुलाई झाली होती. त्याने CSK विरुद्ध एक षटकात पाच षटकार दिले होते.
२०२२ च्या हंगामात केकेआरच्या संघाकडून शिवम मावी याने लखनौ संघाविरुद्ध एका षटकात ५ षटकार दिल्याचा रेकॉर्ड आहे.
२०२३ च्या हंगामात यश दयालवर ही नामुष्की ओढावली होती. गुजरातच्या ताफ्यातून खेळताना रिंकू सिंह याने एका षटकात ५ षटकार मारत सामना फिरवला होता.
या यादीत आपल्या स्फोटक फलंदाजीनं गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या अभिषेक शर्माचंही नाव आहे. २०२३ च्या हंगामात लखनौविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स संघासाठी गोलंदाजी करताना अभिषेक शर्मानं ५ षटकार दिले होते.