प्रियांश आर्य आणि कूपर कॉनॉली यांच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने उभारलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौ सुपर जाएंट्सचा संघ हतबल ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकांत २५४ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौच्या संघाने सलामीच्या रुपात नवा आणि समजण्यापलिकडचा प्रयोग आजमावला. मिचेल मार्शच्या साथीनं आयुष बडोनी याने डावाची सुरुवात केली. तिसऱ्या क्रमांकावर स्वत: कर्णधार फलंदाजीला आला. पण एवढे करूनही डोंगराऐवढ्या धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद २०० धावांपर्यंतच मजल मारू शकला. पंजाब किंग्सने ५४ धावांनी विजय नोंदवत नवा इतिहास रचला आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या १९ वर्षांच्या इतिहासात एका हंगामात सलग सहा विजय मिळवणारा पंजाब किंग्स हा पहिला संघ ठरला आहे.
Web Summary : Punjab Kings defeated Lucknow Super Giants by 54 runs after setting a massive 254-run target. Arya and Connolly's explosive batting powered Punjab. Lucknow's experimental batting order failed to chase the score. Punjab achieved their sixth consecutive win, a new IPL record.
Web Summary : पंजाब किंग्स ने 254 रनों का विशाल लक्ष्य रखते हुए लखनऊ सुपर जायंट्स को 54 रनों से हराया। आर्य और कॉनॉली की विस्फोटक बल्लेबाजी से पंजाब को शक्ति मिली। लखनऊ का प्रयोगात्मक बल्लेबाजी क्रम स्कोर का पीछा करने में विफल रहा। पंजाब ने लगातार छठी जीत हासिल की, जो एक नया आईपीएल रिकॉर्ड है।