शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 06:12 IST

Titwala Drugs Racket News: टिटवाळ्यातून ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि तिच्या घरातून ६ कोटींच्या ५ हजार एक्स्टॅसी गोळ्या जप्त केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पार्टी ड्रग्ज विरूद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. अंमली पदार्थविरोधी विभागाने साकीनाक्यातून जप्त केलेल्या दोनशे एक्स्टॅसी गोळ्यांचे टिटवाळा कनेक्शन उघड होताच, टिटवाळाच्या हायप्रोफाइल सोसायटीत राहणाऱ्या ए. पॉल या महिलेच्या घरी छापा टाकला. तिच्या घरातून ६ कोटींच्या ५ हजार एक्स्टॅसी गोळ्या जप्त करुन तिला अटक करण्यात आली. 

नेस्को प्रकरण उजेडात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकाने साकीनाका येथे छापा घालून २०० एक्स्टॅसी गोळ्या जप्त केल्या. हा साठा बाळगणाऱ्या इरफान अन्सारीला  अटक केली. त्याच्या चौकशीतून पॉलचे नाव समोर आले. पॉल पूर्वी कल्याण येथे राहण्यास होती. दोन महिन्यांपूर्वीच ती टिटवाळा येथे शिफ्ट झाली होती.

असे पोहोचले पोलिस घरापर्यंत...

पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सलग तीन दिवस तांत्रिक पुराव्याच्या आधारे तिचा शोध सुरू केला. पथक तिच्या टिटवाळा येथील कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचले. त्यात तिचे घर शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यातून तिचा शोध घेत शनिवारी रात्री पथकाने घरी छापा टाकला. दरम्यान, तिच्या घरातून ६ कोटी किमतीच्या ५ हजार एक्स्टॅसी गोळ्या मिळून आल्याने पोलिसही चक्रावले. पोलिस आपल्यापर्यंत पोहचतील, असे तिला वाटले नव्हते, त्यामुळे ती बिनधास्त होती. पोलिसांनी इरफाननंतर सुफियान नावाच्या आरोपीला अटक केली. तो पॉल आणि इरफानमधला दुवा होता. पुढे सुफियानमुळे पोलिस पॉलपर्यंत पोहोचले.

डान्सबार गर्ल ते ड्रग्ज सप्लायर... 

पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची. तेथून बाहेर पडल्यानंतर ती ड्रग्ज सप्लायर बनल्याची माहिती आहे. तिची दोन लग्नं झाली आहेत. तिचा एक पती गुन्हेगार असून, तिची हिस्ट्री पोलिसांकडून काढण्यात येत आहे.

घरात चार ते पाच फोन अन् ८ सीमकार्ड 

पॉलकडून ४ ते ५ फोन आणि ७ ते ८ सीमकार्ड जप्त केली. पार्टी ड्रग्जच्या सप्लायसाठी ती या वेगवेगळ्या क्रमांकाचा तात्पुरत्या स्वरुपात वापर करत होती. तिच्या फोनमधून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. 

जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज अन्... 

जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलरसह वेगवेगळी चिन्हे, अक्षरे कोरलेली आहेत. यापूर्वी नेस्को ड्रग्ज पार्टीमध्ये जप्त केलेल्या गोळ्यांवर मर्सिडीजचे चिन्ह होते, तर वरळी पोलिसांनी जप्त केलेल्या गोळ्यांवर ऑडीचे चिन्ह होते. इरफानला अटक झाल्याबाबत पॉलला कल्पना नव्हती. पोलिस तिच्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीत, या विचाराने तिने एवढा साठा घरातच ठेवला.

English
हिंदी सारांश
Web Title : Titwala woman ran Mumbai drug racket from luxury home.

Web Summary : A woman, A. Paul, was arrested in Titwala with ₹6 crore worth of ecstasy pills. Investigations revealed her connection to a Sakinaka drug bust. Paul, a former dancer, supplied party drugs using multiple phones and SIM cards. Police seized thousands of pills with symbols like Mercedes.
टॅग्स :Drugsअमली पदार्थMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई