शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
3
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
4
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
5
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
7
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
8
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
9
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
10
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
11
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
12
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
13
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
14
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
15
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
16
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
17
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
18
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
19
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
20
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
Daily Top 2Weekly Top 5

चोऱ्या करा; महिन्याला २५ हजार पगार घ्या; बिहारी टोळीची बेराेजगारांना विचित्र ऑफर

By नरेश डोंगरे | Updated: April 14, 2026 09:15 IST

Nagpur Crime News: बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्य यामुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अशाच एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे.

- नरेश डोंगरे नागपूर - बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्य यामुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अशाच एका संघटित टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा सूत्रधार बेरोजगार तरुणांना चक्क ‘पगारावर’ ठेवून चोऱ्या करवून घेत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केलेल्या कारवाईत टोळीतील कैलाश दास (वय ४२, जि. खगड़िया, बिहार), मिथिलेश शाह (वय २९) आणि किशन निषाद (वय २२ छत्तीसगड) या तिघांच्या मुसक्या बांधल्या. टोळीचा सूत्रधार बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील असून, सदस्य पेपर वाचण्याचा बहाणा करत चोरी करतात. 

बेरोजगार तरुणांना ‘पगारावर’ गुन्हेगारीटोळीचा सूत्रधार वर्षभर बेरोजगार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणांचा शोध घेत असतो. त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांना १५ ते २५ हजार रुपये मासिक ‘पगार’ देण्याचे आमिष दाखवले जाते. कामाबाबत विचारणा केल्यास सुरुवातीला सोपे काम असल्याचे सांगून नंतर थेट चोरी करण्यास प्रवृत्त केले जाते. अशा प्रकारे अनेक तरुण या जाळ्यात अडकत आहेत.

ट्रेनिंग देऊन बनवतात चोरटोळीत नव्याने सामील झालेल्यांना सुरुवातीला छोट्या चोऱ्यांचे टार्गेट दिले जाते. त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षणही दिले जाते. त्यानंतर हळूहळू मोठ्या चोऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाते. प्रत्येक ‘कामगिरी’नंतर पगार वाढवून त्यांना गुन्हेगारीत ओढले जाते. 

रेल्वे स्थानकांभोवती जाळेसदस्यांना नागपूर, इतवारी, भिलाई, रायगड, बिलासपूर यांसारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात ठेवले जाते. गर्दी आणि प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत क्षणार्धात मौल्यवान वस्तू चोरून आरोपी पसार होतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Job Offer: Steal and Earn ₹25,000 Monthly, Bizarre Gang Exposed

Web Summary : A Bihari gang lured unemployed youth with ₹25,000 monthly salaries to commit thefts. RPF exposed the gang, arresting three. The mastermind trained them, starting with small thefts, eventually targeting crowded railway stations.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी