Kavya Maran Rose video: सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ही आपल्या एक्सप्रेशन्समुळे नेहमीच सोशल मीडियाची 'आयपीएल क्रश' ठरते. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी काव्या स्टेडियममध्ये उपस्थित होती. मात्र, सामन्यानंतर एका चाहत्याने तिला एक गुलाब दिला आणि काव्यानेही ते गुलाब स्वीकारले. नेमके काय घडले, समजून घेऊया.
काव्या मारन हिला कुणी दिला गुलाब?
सामना संपल्यानंतर काव्या मारन स्टेडियममधून बाहेर पडत असताना एका चाहत्याने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. या चाहत्याच्या हातात गुलाब होता. काव्या मारन काही लोकांसोबत लिफ्टमध्ये होती. त्याचवेळी चाहत्याने गर्दीतूनच गुलाब काव्या मारनच्या दिशेने सरकवला. काव्यानेही अतिशय नम्रपणे गुलाब स्वीकारला आणि त्यानंतर चाहता लिफ्टच्या इथून निघून गेला. कारण गर्दी वाढल्याने तेथे जागाच शिल्लक नव्हती. चाहत्याचे हे अनपेक्षित कृत्य पाहून काव्या मारन सुरुवातीला थोडी थक्क झाली. मात्र, नंतर तिने अतिशय नम्रपणे हसून त्या चाहत्याचा स्वीकार केला. त्यानंतर तिच्या सुरक्षारक्षकांनी (Security) चाहत्याला बाजूला केले. पण हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.
सोशल मीडियावर चर्चा
हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच 'काव्या मारन' पुन्हा एकदा ट्रेंड होऊ लागली आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, सनरायझर्स सामना जिंकला, पण या चाहत्याने काव्याचे मन जिंकले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर निसटता विजय मिळवला.
Web Summary : After SRH's win, a fan gifted Kavya Maran a rose as she exited the stadium. She graciously accepted it, leaving her surprised but smiling. The moment was caught on camera and went viral.
Web Summary : SRH की जीत के बाद एक प्रशंसक ने काव्या मारन को स्टेडियम से बाहर निकलते समय गुलाब भेंट किया। उन्होंने विनम्रतापूर्वक इसे स्वीकार किया, जिससे वह हैरान रह गईं लेकिन मुस्कुराईं। यह पल कैमरे में कैद हो गया और वायरल हो गया।