शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा ११ ला

By admin | Updated: October 5, 2016 03:20 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन : मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, राधामोहन सिंग, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गुरुवार ६ तारखेपासून सोहळ्याला सुरुवात होत असून मुख्य सोहळा हा अशोक विजयादशमीच्या दिवशी ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल.
दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत यासंबंधी सविस्तर माहिती देताना सांगितले, स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या यंदाच्या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नाटकचे समाजकल्याण मंत्री एच. अंजय्या, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके उपस्थित राहतील. याशिवाय देशविदेशातील बौद्ध भदंत व विचारवंत देखील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेत स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य विजय चिकाटे, एल.आर. सुटे, विजय गजघाटे, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. सुधीर फुलझेले, प्रा. प्रकाश खरात, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. गौतम कांबळे, कैलास वारके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

गेल्या वर्षी ४७.५० लाख रुपये दान
दीक्षाभूमीवर येणारे लाखो अनुयायी स्मारक समितीच्या कामाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने दान करतात. गेल्या वर्षीपासून मिळालेले दान जाहीर करण्याची पद्धत स्मारक समितीने सुरू केली आहे. मार्च २०१५ ते मार्च २०१६ या दरम्यान दीक्षाभूमीतील दान पेटीमध्ये एकूण ४७ लाख ५० हजार रुपयाचे दान अनुयायांनी जमा केले. ते स्मारक समितीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले यांनी ही माहिती दिली. हा सर्व निधी धम्मदीक्षा सोहळ्यासाठी वापरला जातो. सोहळ्यासाठी किमान ६० ते ७० लाखाचा खर्च येतो. हा खर्च समिती स्वत:तर्फे करते, असेही त्यांनी स्पष्ट केले.