शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; कोरोनाच्या स्ट्रेनबाबत दिल्लीच्या अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 15:46 IST

Nagpur News शहर व ग्रामीण भागातील लॉकडाऊनची मर्यादा आता वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना येथे शनिवारी दुपारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहर व ग्रामीण भागातील लॉकडाऊनची मर्यादा आता वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना येथे शनिवारी दुपारी केली.

शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर पसरत असण्याच्या काळात हा संसर्ग कमी करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते, व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी बोलताना नितीन राऊत यांनी, शहरात व ग्रामीण भागात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या काळात अर्थचक्र रोखले जाणार नाही याची काळजी घेऊ असेही सांगितले. 

फळे, भाजीपाला, धान्य दुकाने 4 वाजता पर्यंत सुरू राहतील, ऑनलाईन रेस्टरंट 7 वाजता पर्यंत सुरू राहतील असेही सांगितले.

शहरातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची चाचणी करण्यासाठी त्याचे नमुने दिल्लीत पाठवले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे, त्यांनी दिल्लीतून आम्हाला हा अहवाल लवकरात लवकर मिळवून द्यावा. त्यांनी तसे आश्वासन दिले असल्याचे राऊत पुढे म्हणाले.नागपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा दोन हजारावरून साडेतीन हजारावर गेला आहे. ही चिंतेची बाब आहे. आम्ही लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्याचे ठरविले आहे असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस