शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जैन मायनॉरिटी फेडरेशनने शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा प्रसार करावा- विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 03:10 IST

महाराष्ट्रातील जनजागरण योजनेचा शुभारंभ

नागपूर : अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने केंद्र व राज्य सरकारांच्या अल्पसंख्याक योजनांच्या प्रसारासाठी सुरू केलेले जनजागरण अभियान उपयुक्त असून, या प्रचार अभियानाची व्याप्ती छोट्या-छोट्या गावांपर्यंत तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या अल्पसंख्याक योजना व आर्थिक आधारावरील आरक्षणाच्या योजनांच्या माहितीसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय जनजागरण अभियानाच्या महाराष्ट्रातील शुभारंभानिमित्त लोगोचे दर्डा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मार्गदर्शक मंडळाचे प्रमुख विजय दर्डा यांना गेल्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल सादर करण्यासाठी, तसेच येत्या वर्षातील नवीन उपक्रमांची माहिती देण्यासाठी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी यवतमाळ हाऊस, नागपूर येथे विशेष बैठक आयोजित केली. यावेळी  दर्डा यांच्याकडे कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला.  फेडरेशनतर्फे शालेय स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये जैन समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला असल्याची माहिती देण्यात आली. तसेच केंद्र व राज्य सरकारतर्फे युवक व महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना प्रभावीपणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर युवकांना नवीन व्यापारासाठी उपलब्ध असलेल्या कर्जाच्या योजना, विदेशातील शिक्षणासाठी असलेले कर्ज, अनुदानाच्या योजना या क्षेत्रातील केलेल्या कामाचा विस्तृत अहवालही सादर करण्यात आला. केंद्र सरकारतर्फे ‘हमारी धरोहर’ या नावाने प्राचीन जैन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी तसेच प्राचीन जैन ग्रंथांचे पुनर्लेखन यासाठी सुरू असलेल्या योजनेमध्ये समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी अधिक कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांसाठी समाजभवन निर्माण करणे, शिक्षणाच्या सुविधा वाढविण्यासाठी नवीन शिक्षण संस्थांच्या उभारणीसाठी असलेल्या योजना समाजापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले. दर्डा यांनी जनगणना-२०२१ योग्य पद्धतीने समाजापर्यंत पोहोचेल, यासाठी बारकाईने लक्ष देण्याची सूचना केली. तसेच केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या आर्थिक आधारावरील आरक्षणाची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे सांगून, या आरक्षणामुळे जैन समाजातील पात्र घटक शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये आपला अधिकार मिळवू शकतील, असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, उज्ज्वल पगारिया, अनिल पारख, संतोष पेंढारी, अतुल कोटेचा, निखिल कुसुमगर, नरेश पाटणी. डॉ. रिचा जैन, सुनील जैन, विनय आकुलवार यांनी सहभाग घेतला.जनगणनेत ‘जैन’ एवढाच उल्लेख करा‘जनगणना-२०२१’मध्ये कुटुंबाची माहिती भरताना धर्म व जात या दोन्ही रकान्यांमध्ये जैन धर्मातील लोकांनी आपले गोत्र, उपजाती, पंथ, संप्रदायांचा उल्लेख न करता फक्त ‘जैन’ एवढाच उल्लेख करावा, ज्यामुळे जैन समाजाची खरी संख्या अधिकृतपणे सरकार दप्तरी नोंद होईल. सध्या भारतात जैन समाजाची एकूण संख्या दोन कोटींपेक्षा अधिक असली तरीही सरकारच्या जनगणनेच्या रेकॉर्डमध्ये फक्त ४५ लाख इतकीच नोंद आहे. ही नोंद दुरुस्त होणे आवश्यक असल्याने याबाबतीत समाजातल्या सर्वच घटकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन ललित गांधी यांनी यावेळी केले.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा