पवार-तटकरे भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे; चंद्रशेखर बावनकुळेंचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:22 IST2026-05-14T13:21:02+5:302026-05-14T13:22:45+5:30
Nagpur : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चाना उधाण आले आहे. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका मांडत या भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.

It is wrong to give political colour to Pawar-Tatkare meeting; Chandrashekhar Bawankule's opinion
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चाना उधाण आले आहे. या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका मांडत या भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयुष्यभर शरद पवार यांच्या राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक विषयांमध्ये साथ दिली आहे. त्या अनुषंगाने कधी-कधी आपल्या स्नेहींसोबत चर्चा करावीशी वाटते. मीसुद्धा राज ठाकरे यांच्याकडे जाऊन आलो आहे. अशा भेटींना राजकीय संदर्भातून पाहणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.
मतीन पटेलविरोधात झालेल्या बुलडोझर कारवाईवरही त्यांनी भाष्य केले. निदा खानसारख्या गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला अशा प्रकारे आश्रय देणे चुकीचे आहे. पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली असावी. समाजाला हादरवणाऱ्या गुन्ह्यांतील आरोपींना मदत करणे योग्य नाही, ही संस्कृती सर्व पक्षांनी पाळली पाहिजे, असे ते म्हणाले. परभणीतील वाळूमाफिया आरोपींना आम्ही सोडणार नाही. यापूर्वी बुलढाण्यात तहसीलदारांवर हल्ला झाल्यानंतर आरोपींना तत्काळ अटक करून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.
इंदिरा गांधींनीही सोने खरेदी न करण्याचे केले होते आवाहन
- यावेळी बावनकुळे यांनी इंधन व सोने खरेदीबाबतही वक्तव्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक वेळा सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले होते. तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही तसेच आवाहन केले होते.
- महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता. देश मजबूत करण्यासाठी काही काळ काही प्रमाणात काटकसर करावी लागली, तर त्यात काहीच गैर नाही. स्वदेशीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर करून आपण सहज जीवन जगू शकतो, असे बावनकुळे म्हणाले.