प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:25 IST2026-05-15T13:24:35+5:302026-05-15T13:25:16+5:30

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे पितळ व्यापाऱ्याच्या घरात झालेल्या सवा कोटींच्या दरोड्या खुलासा झाला आहे. व्यापाऱ्याच्या मुलीनेच प्रियकरासाठी घरात दरोडा टाकला होता.

Daughter commits murder for love; Daughter robs billionaire father's house to run away with boyfriend | प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा

प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये याच प्रेमापोटी एका मुलीने आपल्याच कुटुंबाचा घात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मोठ्या पितळ व्यापाऱ्याच्या घरात पडलेल्या सवा कोटींच्या सळसळत्या दरोड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या संपूर्ण गुन्ह्याची मास्टरमाईंड दुसरी कोणी नसून त्या व्यापाऱ्याची पोटची मुलगी अरीबा असल्याचे उघड झाले आहे. वेगवेगळ्या जातीमुळे लग्नाला होणारा विरोध झुगारून प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी तिने स्वतःच्याच घरात डाका टाकण्याची योजना आखली होती.

७ वर्षांचं प्रेम अन् सवा कोटींची लूट

मुरादाबादच्या नागफनी भागातील अकबर कंपाउंडमध्ये राहणारे प्रसिद्ध पितळ व्यापारी मोहम्मद इम्रान यांच्या घरात ११ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला होता. या हायप्रोफाईल दरोड्याच्या तपासात पोलिसांनी जेव्हा कड्या जोडायला सुरुवात केली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. इम्रान यांची मुलगी अरीबा हिचे अमरोहा येथील अरशद वारसी नावाच्या तरुणासोबत गेल्या ७-८ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, वेगवेगळ्या जातीचे असल्याने कुटुंबीय या लग्नाला तयार नव्हते. अखेर, पैशांच्या जोरावर पळून जाऊन नवीन संसार थाटण्यासाठी या प्रेमी युगुलाने घरातच दरोडा टाकण्याचा कट रचला.

बापाच्या घराची किल्ली प्रियकराच्या हाती!

अरीबा हिने अत्यंत शातीरपणे महिनाभरापूर्वीच घराच्या मुख्य गेटची चावी प्रियकर अरशदच्या स्वाधीन केली होती. ११ मे च्या पहाटे ४ वाजता जेव्हा संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते, तेव्हा अरीबाने आतून घराचा 'डिजिटल लॉक' उघडला आणि दरोडेखोरांना थेट घरात प्रवेश दिला. दरोडेखोरांनी घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत सर्वांना ओलीस ठेवले. घरातून सवा कोटींची रोकड लुटल्यानंतर, कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी जाताना सीसीटीव्हीचे डीव्हीआरदेखील उखाडून नेले.

पोलिसी खाक्या अन् इश्कबाज लेक जेरबंद

या खळबळजनक दरोड्यानंतर मुरादाबादचे एसएसपी सतपाल अंतिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चार पथके तयार करून तपास सुरू केला. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांचा संशय घरातील सदस्यांवरच गेला. पोलिसांनी अरीबा आणि तिचा प्रियकर अरशद यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांना वेढा घालून अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून ४७ लाख २४ हजार रुपयांची रोकड, चार गावठी कट्टे, पाच मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील उर्वरित रक्कम जप्त करण्यासाठी आणि फरार साथीदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

Web Title : प्यार के लिए बेटी ने लूटा बाप का घर, प्रेमी संग हुई फरार।

Web Summary : मुरादाबाद में, एक बेटी ने प्रेमी के साथ भागने के लिए अपने करोड़पति पिता के घर में डकैती डाली। पुलिस ने साजिश का पर्दाफाश किया, बेटी, उसके प्रेमी और साथियों को गिरफ्तार किया, और चोरी हुए धन और हथियारों का एक महत्वपूर्ण हिस्सा बरामद किया।

Web Title : Daughter robs millionaire father's house to elope with lover.

Web Summary : In Moradabad, a daughter orchestrated a robbery in her wealthy father's home to fund her elopement with her boyfriend. The police uncovered the scheme, arresting the daughter, her lover, and accomplices, recovering a significant portion of the stolen money and weapons.