शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘टू फिंगर्स टेस्ट’वर संशोधनात्मक माहिती सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 19:01 IST

Nagpur News बलात्कार पीडितेचे कौमार्य तपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनधिकृत ‘टू फिंगर्स टेस्ट’ विरुद्धच्या जनहित याचिकेमध्ये संशोधनात्मक माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्या ॲड. स्मिता सरोदे-सिंगलकर यांना दिले.

ठळक मुद्देयाचिकाकर्त्या ॲड. स्मिता सिंगलकर यांना निर्देश

नागपूर : बलात्कार पीडितेचे कौमार्य तपासण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनधिकृत ‘टू फिंगर्स टेस्ट’ विरुद्धच्या जनहित याचिकेमध्ये संशोधनात्मक माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्या ॲड. स्मिता सरोदे-सिंगलकर यांना दिले. याकरिता त्यांना चार आठवडे वेळ देण्यात आला. (Introduce research information on ‘Two Fingers Test’)

याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील मुद्दे अतिशय महत्त्वपूर्ण असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, आवश्यक संशोधनात्मक माहिती रेकॉर्डवर असल्याशिवाय काहीही करणे शक्य नाही, असे न्यायालयाने हे निर्देश देताना नमूद केले. ‘टू फिंगर्स टेस्ट’ अवमानजनक, मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी व आधारहीन आहे. त्यामुळे या टेस्टवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी आणि टेस्टविषयीची माहिती सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांमधून वगळण्यात यावी, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.

‘टू फिंगर्स टेस्ट’विरुद्ध यापूर्वी डॉ. रंजना पारधी यांनी २०१० मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानंतर राज्य सरकारने ‘टू फिंगर्स टेस्ट’वर बंदी आणून बलात्कार पीडितेच्या कौमार्य चाचणीकरिता १० मे २०१३ रोजी नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. २९ जानेवारी २०१४ रोजी उच्च न्यायालयाने ती मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारून जनहित याचिका निकाली काढली. तसेच, या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.

असे असले तरी राज्यातील विविध भागांमध्ये आजही टू फिंगर्स टेस्ट केली जात आहे, तसेच एम. बी. बी. एस. पदवीच्या दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमात समावेश असलेल्या एस. के. सिंगल यांच्या ‘फॉरेन्सिक मेडिसीन ॲण्ड ज्युरिसप्रुडेन्स’ पुस्तकात टू फिंगर्स टेस्टची माहिती व संदर्भ देण्यात आले आहेत असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय