शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मानक ब्युरोच्या वैज्ञानिकास अटक

By admin | Updated: March 11, 2015 02:17 IST

गोकुळपेठ येथील भारतीय मानक ब्युरोचे क श्रेणीचे वैज्ञानिक बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण) भ्रष्टाचारविरोधी शाखेने सापळा रचून १५ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली.

नागपूर : गोकुळपेठ येथील भारतीय मानक ब्युरोचे क श्रेणीचे वैज्ञानिक बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांना सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण) भ्रष्टाचारविरोधी शाखेने सापळा रचून १५ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यांना मंगळवारी सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस. मुरकुटे यांच्या न्यायालयात हजर करून, त्यांचा १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. या सापळ्याची माहिती अशी, हिंगणघाट येथील उद्योजक अशफाक अली उस्मान अली यांची वर्धा येथे बाबूजी अ‍ॅक्वा नावाची कंपनी होती. या कंपनीत प्रक्रिया केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तयार करून त्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या कंपनीला भारतीय मानक ब्युरोचा परवाना होता. एप्रिल २०१४ मध्ये या कंपनीच्या परवान्याची मुदत संपली होती. त्यामुळे या कंपनीचा एकूण व्यवहार बंद झाला होता. धाड घालून आकस्मिक पाहणीनागपूर : भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर धाड घालून आकस्मिक पाहणी केली होती. त्यात ही कंपनी बंद असल्याचे निदर्शनास आले होते. या कंपनीच्या गैरप्रकाराच्या संदर्भात भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई करून वर्धा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला भरला होता. २० डिसेंबर २०१४ रोजी खटल्याचा निकाल लागून अशफाक अली हे निर्दोष ठरले होते. वैज्ञानिक बिपीन जांभूळकर यांनी अशफाक अली यांना आपल्या कार्यालयात बोलावून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाच्याविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल करण्याची तसेच हे प्रकरण दिल्लीपर्यंत नेण्याची धमकी दिली होती. असे न करण्यासाठी त्यांनी अली यांना ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. सौदेबाजी होऊन १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. सोमवारी लाचेची ही रक्कम घेताना जांभूळकर यांना अटक करण्यात आली. लाचेचा सापळा यशस्वी झाल्यानंतर लगेच आरोपीची अपसंपदा हुडकून काढण्यासाठी सीबीआय पथकाने जांभूळकर यांच्या निवासस्थानावर धाड घालून कसून झडती घेतली. आज सीबीआय अधिकाऱ्यांनी आरोपीला न्यायालयात हजर करून चार दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने दोन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. न्यायालयात सीबीआयचे वकील ए. एच. खान यांनी सीबीआयची बाजू मांडली.(प्रतिनिधी)