शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून तरुणीची राजस्थानमध्ये विक्री

By admin | Updated: July 16, 2014 01:16 IST

पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या महिला साथीदारांच्या मदतीने एका तरुणीचे अपहरण केले आणि नंतर तिची राजस्थानमध्ये नेऊन विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवघ्या पोलीस दलाचीच

पोलीस हवालदार मुख्य आरोपी : दोन महिलांचाही सहभाग नरेश डोंगरे - नागपूर पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या महिला साथीदारांच्या मदतीने एका तरुणीचे अपहरण केले आणि नंतर तिची राजस्थानमध्ये नेऊन विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवघ्या पोलीस दलाचीच मान शरमेने झुकविणारे हे प्रकरण गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हवालदाराचे नाव संतोष असून, तो परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. (लोकमतला संपूर्ण माहिती आहे. मात्र, त्या पोलीस ठाण्याची बदनामी होऊ नये आणि तपासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून, आज त्याचे पूर्ण नाव आणि नियुक्तीचे स्थान छापण्याचे आम्ही टाळत आहोत.काही दिवसांपूर्वी गिट्टीखदानमधील रजनी (वय २५, नाव काल्पनिक) अचानक बेपत्ता झाली. पोलीस तपासात रजनीचे अपहरण करून राजस्थानमध्ये तिची विक्री झाल्याची धक्कादायक माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कसून तपास केला असता पोलीस दलाला हादरा देणारी माहिती उघड झाली. रजनीचे अपहरण आणि राजस्थानमध्ये नेऊन विकण्याचा गंभीर गुन्हा एका पोलीस हवालदाराने केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे शहर पोलीस दलातील वरिष्ठ कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी या आरोपी हवालदाराला नजरकैद करून त्याच्या मीना नामक मैत्रिणीलाही ताब्यात घेतले. या दोघांच्या माहितीवरून अपहृत रजनीचा पत्ता मिळवण्यात आला असून, पोलीस पथक तिची सोडवणूक करण्यासाठी राजस्थानला रवाना झाले. अपहरण आणि विक्रीसारख्या गंभीर गुन्ह्यात खुद्द पोलीस हवालदारच मुख्य आरोपी असल्याने हे प्रकरण अत्यंत गोपनीय पध्दतीने हाताळले जात आहे.