शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा निधी कागदावरच मंजूर ! महापालिकेचे प्रकल्प रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:42 IST

Nagpur : महापालिकेची ६८३ कोटींची सरकारकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने शहराच्या पायाभूत विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला मंजूर केला. परंतु, त्याची पूर्तता महापालिकेला झाली नाही. त्यामुळे विकासकामे रखडलेली आहे. महापालिकेने ६८३ कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

शहरातील पायाभूत सुविधांच्या कामासाठी २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत राज्य सरकारने महापालिकेला १,९८७.६० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ ३५७.१२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. त्यापैकी महापालिकेला केवळ ४२.९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधी न मिळाल्याने शहरात सुरू असलेले काही विकास प्रकल्प संथगतीने सुरु असून, कंत्राटदारांची देयके प्रलंबित आहेत. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत महापालिकेच्या ९५७.०१ कोटींच्या मलनि:स्सारण प्रकल्पास केंद्र शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यामध्ये दक्षिण-पश्चिम क्षेत्रातील पोहरा नदी वाहत असलेल्या भागांमध्ये मलनि:स्सारणाचे कार्य केले जाणार होते.

प्रकल्पांतर्गत लक्ष्मीनगर, हनुमान नगर, धंतोली झोनमध्ये पूर्ण तर नेहरूनगर झोनच्या काही भागांमध्ये नवीन सिवर लाइन टाकली जाणार होती. या प्रकल्पाचे २३९.२५ कोटी वितरित करण्यात आले आहेत.

सोनेगाव तलाव सौंदर्गीकरण रखडलेनिधीअभावी परिणाम झालेल्या प्रकल्पांमध्ये सुमारे ७७०.८३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना सर्वाधिक फटका बसला आहे. या प्रकल्पांसाठी केवळ ८८.०९ कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, यापैकी केवळ २०.१६ कोटी रुपयेच महापालिकेला प्राप्त झाले. यामध्ये पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर व दक्षिण पश्चिम नागपुरातील सिमेंट रोडचे काम, रस्त्याचे डांबरीकरणाचे काम, पावसाळी नाल्या, गडरलाइन या कामांचा समावेश आहे. सोनेगाव तलाव सौंदर्याकरणाचे काम रखडलेले आहे.

पुराच्या नुकसानीचे केवळ १४.५१ कोटीमहसूल आणि वन विभागाकडून पुरामुळे नुकसान झालेल्या कामांसाठी २०४.७२ कोटी मंजूर झाले होते. मात्र, मिळाले केवळ १४.५१ कोटी. पुरामुळे झालेल्या नुकसानीची कामे शहरात सुरू असली, तरी महापालिका स्वतः खर्च करीत आहे. यामध्ये केलेल्या कामाचे कंत्राटदारांचे देयके प्रलंबित असल्याने मार्चपर्यंत हा निधी मिळावा, अशी महापालिकेला अपेक्षा आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर