शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

विशेष परीक्षेच्या प्रारूपाला मिळणार मान्यता

By admin | Updated: July 3, 2014 00:55 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावूनदेखील विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाने पूर्ण जोर लावला आहे.

नागपूर विद्यापीठ : आज विद्वत परिषदेची तातडीची बैठकनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावूनदेखील विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाने पूर्ण जोर लावला आहे. यासंदर्भात गुरुवारी विद्वत्त परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विशेष परीक्षेच्या अध्यादेशाच्या प्रारूपाला मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.११ जून रोजी राज्य शासनाने प्रवेशबंदीच्या यादीतील महाविद्यालयांमधील प्रविष्ट विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर २६ जून रोजी झालेल्या विद्वत्त परिषदेच्या तातडीच्या बैठकीत संस्थाचालकांच्या दबावामुळे ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांची परीक्षा कशी आणि कधी आयोजित करण्यात यावी यासंदर्भात नियम ठरविण्यासाठी तसेच प्रारूप तयार करण्यासाठी संबंधित प्रस्ताव परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आला. परंतु संबंधित मुद्यावर प्रारूप तयार करण्याचे परीक्षा मंडळाला अधिकारच नाही अशी भूमिका सदस्यांनी घेतल्यामुळे या मुद्याला अजेंड्यावरून हटवावे लागले. अध्यादेश प्रारूप समितीने प्रस्तावित अध्यादेशाचे प्रारूप तयार केले असून विद्वत्त परिषदेच्या मान्यतेसाठी याला ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच गुरुवारी विद्वत्त परिषदेची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. या प्रारूपाला मान्यता मिळाल्यानंतर त्याला व्यवस्थापन परिषदेकडे पाठविण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)