शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

हजारांमध्ये सहा जणांना मिरगीचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

- आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन नागपूर : अपस्मार म्हणजे मिरगी हा मेंदूचा एक सामान्य आजार आहे. उपचारामुळे त्याला प्रतिबंधित करणे ...

- आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन

नागपूर : अपस्मार म्हणजे मिरगी हा मेंदूचा एक सामान्य आजार आहे. उपचारामुळे त्याला प्रतिबंधित करणे शक्य आहे. भारतात हजार लोकांमध्ये मिरगीचे सहा रुग्ण आढळून येतात. दरवर्षी एक लाख लोकसंख्येत ५० नव्या रुग्णांची भर पडते. या आजाराचा पुरुष आणि स्त्रियांवर सारखाच प्रभाव पडतो. सुमारे ७५ टक्के रुग्णांमध्ये अपस्मारविरोधी औषधांद्वारे चांगले नियंत्रण मिळवता येते. उर्वरित २५ टक्के रुग्णांपैकी जवळपास ५० टक्के रुग्णांमध्ये अपस्मार, शस्त्रक्रियेने बरा होऊ शकतो, असे ‘इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. जेएमके मूर्ती यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. मूर्ती म्हणाले, अपस्माराबद्दल अनेक चुकीच्या संकल्पना आणि कल्पना आहेत. काही जणांचा विश्वास आहे की, अपस्मार हा एक संसर्गजन्य रोग आहे. अपस्मार हा भारतामध्ये आणि बऱ्याच गरीब देशांमध्ये भयंकर कलंक आणि भेदभावाशी संबंधित आहे, यामुळे या आजाराविषयी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे.

-मिरगीविरुद्ध एकत्र काम करण्याची गरज - डॉ. मेश्राम

वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, अपस्मार असलेल्या लोकांबद्दल समाजाचे दृष्टिकोन नेहमीच नकारात्मक राहिला आहे. अपस्मार असलेल्या रुग्णांविषयी समाजाच्या या वृत्तीमध्ये कठोर बदल आवश्यक आहे. अपस्मार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चांगल्या आयुष्याची संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे.

- मिरगीबाबत गैरसमज दूर होणे आवश्यक - डॉ. श्रीनिवास

आयएएनचे माजी अध्यक्ष डॉ. एच. व्ही. श्रीनिवास म्हणाले, अपस्माराबाबत अनेक गैरमसज आहेत. यामुळे या आजाराच्या रुग्णाला शिक्षण, खेळ, नोकरी, विवाह आदी क्षेत्रांत अडचणी निर्माण होतात. हे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. कोलकात्यातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. गौतम गांगुली म्हणाले, या आजाराच्या रुग्णाला अयोग्य पद्धतीची वागणूक मिळत असल्याने त्याचा परिणाम त्याच्या मनावर होतो. आयुष्यात दीर्घकाळ नैराश्य आणि तणावात जगतो.

- वाढत्या वयानुसार अपस्माराचा धोकाही वाढतो - डॉ. अग्रवाल

लखनौच्या केजीएमसी न्यूरोलॉजीचे माजी प्रमुख डॉ. अतुल अग्रवाल

यांनी सांगितले, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश हे मिरगीच्या उच्च शक्यतांशी संबंधित आहे. मानसशास्त्रज्ञ कॅरोल डिसोझा यांनी सांगितले, अपस्मार असलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे योग्य समुपदेशन होणे उपचाराएवढेच महत्त्वाचे ठरते. न्यूरोलॉजीचे प्राध्यापक डॉ. परमप्रीतसिंग यांनी सांगितले, अपस्मारासारखी लक्षणे असलेले आणखी काही आजार आहेत. यामुळे वेळीच निदान होणे गरजेचे असते. भारतीय एपिलेप्सी असोसिएशनचे सचिव डॉ. बी राजेंद्रन म्हणाले, अपस्माराचा कलंक सार्वत्रिक असला तरी स्त्रियांवर त्याचा प्रभाव चिंताजनक आहे.