शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाट वाढले खाद्यतेलाचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

नागपूर : यंदा सोयाबीनसह सर्व खाद्यतेलाच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक ८० टक्के विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाने दोन महिन्यात ...

नागपूर : यंदा सोयाबीनसह सर्व खाद्यतेलाच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक ८० टक्के विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाने दोन महिन्यात तब्बल ३५ रुपयांनी वाढून किरकोळ बाजारात प्रति किलो १३५ रुपयाचा आकडा गाठला आहे. त्याखालोखाल विकले जाणारे सूर्यफूल तेल १४५ रुपयावर पोहोचले आहे. दरवाढीमुळे स्वयंपाकघरात तेलाची फोडणी महाग झाली असून, गरीब व सामान्यांची ओरड सुरू आहे. जबाबदार अधिकारी दरवाढीवर मूग गिळून बसल्याने साठेबाजारांना दरवाढीसाठी रान मोकळे झाल्याचा ग्राहक आणि ग्राहक संघटनांचा आरोप आहे.

यावर्षी देशात सोयाबीन आणि पाम कच्च्या तेलाची ६० टक्के आयात होत आहे. आयात खर्च वाढल्याने देशांतर्गत स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्य तेलाच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनला जास्त भाव मिळत नसताना तेलाचे भाव का वाढत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. दरदिवशी होणाऱ्या दरवाढीने ग्राहक त्रस्त आहेत. प्रशासनाने साठेबाजांवर धाडी टाकून तेलाचा साठा बाजारात आणल्यास काही प्रमाणात किमती कमी होण्यास मदत होणार आहे.

इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, देशात यंदा सोयाबीनचे पीक ३० टक्के आले आहे, शिवाय अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून सोयाबीन कच्च्या तेलाची आयात कमी असल्याने देशांतर्गत स्थानिक बाजारापेठांमध्ये गेल्या दोन महिन्यात सर्व खाद्यतेलाच्या किमतीत किरकोळमध्ये प्रति किलो २५ ते ३५ रुपयापर्यंत वाढ झाली आहे. दरदिवशी दर वाढतच आहेत. दर आणखी किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. ठोक विक्रेत्यांकडून माल आल्यानंतर किरकोळमध्ये विक्री केल्या जाते. दरवाढीसाठी किरकोळ विक्रेते कारणीभूत नाहीत.

कच्च्या तेलाची ६० टक्के आयात

देशात जवळपास ५० टक्के सोयाबीन कच्च्या तेलाची आयात अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून होते. पण यंदा भारतातसह अर्जेंटिनामध्ये पिकाला फटका बसला आहे. शिवाय चीन या देशांमधून सोयाबीनची मोठ्या प्र्रमाणात खरेदी करीत आहे. याशिवाय भारतात मलेशिया आणि इंडोनिशिया या देशातून पाम तेलाची आयात ८० टक्क्यांपेक्षा जास्त होते. भारतात केंद्र सरकारने पाम तेलावर १० टक्के आयात शुल्क कमी केले, तर मलेशियाने निर्यातीवर ८ टक्के शुल्क वाढविले. त्यामुळे देशात आयात महाग होते. त्याचा फटका पाम तेलाला बसला आहे. आयात व निर्यातीचा ताळमेळ बसत नसल्याने आणि चीन सोयाबीन मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याने भारतात खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

खाद्यतेल किलो (रुपये) दरवाढीचा तक्ता :

खाद्यतेल २३ डिसें.३ जाने.

सोयाबीन १२२ १३५

सूर्यफूल १४० १४५

शेंगदाणा १६० १६०

पाम ११५ १३०

मोहरी १३० १४०

राईस १३० १३५

तिल्ली १५० १६०

जवस १२५ १३०

खोबरा २२० २३०