शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीसाठी मदत करणार !

By admin | Updated: July 11, 2014 01:22 IST

पावसाने प्रदीर्घ उसंत घेतल्याने खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याबाबत शासन

पालकमंत्र्यांचे संकेत : २० टक्के क्षेत्रावरील पेरणी बुडणारनागपूर : पावसाने प्रदीर्घ उसंत घेतल्याने खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याबाबत शासन विचार करेल. याबाबत अंतिम निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मोघे बोलत होते. जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत २ लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यापैकी २० टक्के क्षेत्रावरील पेरणी उलटण्याची शक्यता असून तेथे दुबार पेरणी करावी लागेल. २०१३ मध्ये १० जुलैपर्यंत २८३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत फक्त ९१ मि.मी. पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती नाजूक आहे.सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई नसली तरी पुढच्या काही दिवसातही पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. सध्या जिल्ह्यात १४ टँकर सुरू असून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे, असे मोघे म्हणाले. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना शासन मदत करणार का? असा सवाल मोघे यांना केला असता राज्यभरातील परिस्थिती बघता शासन याबाबत विचार करू शकते. अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात दृष्काळसदृश्य स्थिती आहे. सरकारने यासंदर्भात सर्वेक्षण केले आहे. दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही निकष आहेत. त्यानुसार शासन निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नेहमीच शासनाने शेतकऱ्यांची मदत केली आहे. प्रथम अतिवृष्टीसाठी व त्यानंतर गारपीट झाल्यावर अशी एकूण सात हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त भागात करावयाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पावसाला विलंब झाल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन व विजय आदमने उपस्थित होते. (प्रतिनिधी)