शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जबडा-कपाळ छेदून गोळी थेट बाहेर; मृत्यूच्या जबड्यातून पोलिसाला वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 08:00 IST

नाकाच्या आतील भागातून गोळी गेल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. श्वासोच्छ्वासासाठी गळ्यात तात्पुरता छिद्र करून श्वासनलिकेत ट्यूब टाकण्यात आली. 

नागपूर : ड्यूटीवर असताना एका पोलिस जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली. गोळी खालच्या जबड्यातून कपाळाचे हाड छेदून बाहेर पडली. गंभीर जखमी अवस्थेत पोलिस जवानाला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून व अचूक उपचार करून पोलिसाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले. लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे.

१८ जानेवारीला सकाळी ही घटना घडली. जखमी पोलिसाला तातडीने नागपूर ‘एम्स’च्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल केले. खालच्या जबड्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. नाकाच्या आतील भागातून गोळी गेल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. श्वासोच्छ्वासासाठी गळ्यात तात्पुरता छिद्र करून श्वासनलिकेत ट्यूब टाकण्यात आली. 

आतील हाडांचे नुकसान खालच्या जबड्यातून गोळी आत शिरून वरचा जबडा, नंतर नाकाचे हाड, कपाळाचे हाड छेदून बाहेर पडल्याने चेहऱ्याच्या आतील हाडांचे मोठे नुकसान झाले होते. डॉक्टरांनी चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून हाडे पुन्हा व्यवस्थित बसविली आहे. त्यासाठी विशेष मेटल प्लेट आणि स्क्रूचा वापर केला गेला.

‘एम्स’च्या आपत्कालीन सेवेचे हे उत्तम उदाहरण ठरले. डॉक्टरांच्या पथकाने वेळेत अचूक निर्णय घेऊन उपचार केल्याने पोलिस जवानाचा जीव वाचला. डॉ. प्रशांत जोशी, कार्यकारी संचालक एम्स, नागपूर

टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिस