शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालकांनी घेतली अधीक्षकांची बैठक

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच नागपुरात पोहचलेले पोलीस महासंचालक (डीजी) ...

हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताचा आढावानागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच नागपुरात पोहचलेले पोलीस महासंचालक (डीजी) प्रवीण दीक्षित यांनी नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेची स्थिती जाणून घेतली. दीक्षित आज सकाळी रेल्वेने नागपुरात पोहचले. साधेपणा आणि शिस्त यासाठी परिचित असलेल्या दीक्षित यांनी स्थानकावर आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हसतमुखाने हस्तांदोलन करताना पोलीस जिमखाना गाठला. दुपारी शहरातील अधिकाऱ्यांशी धावती बातचित केल्यानंतर त्यांनी दुपारी ३ वाजता नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला नागपूर ग्रामीणच्या अधीक्षक डॉ. आरती सिंह, भंडाऱ्याचे अधीक्षक दिलीप झळके, गोंदियाचे अधीक्षक मीणा, वर्धा येथील अंकित गोयल आणि चंद्रपूरचे अधीक्षक संदीप दिवाण हजर होते. गडचिरोलीचे अधीक्षक संदीप पाटील अनामिक कारणांमुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. बैठकीत डीजींनी सर्व पोलीस अधीक्षकांकडून त्यांच्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्थेची माहिती घेतली. त्यांना अधिवेशन काळात अधिकाधिक चांगली स्थिती ठेवण्याची आणि गुन्हे कमी करण्याच्या सूचना केल्या. जिव्हाळ्याचा विषय असलेले ‘पोलीस मित्र‘ वाढवण्यावरही दीक्षित यांनी भर दिला. (प्रतिनिधी)