'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप

By कमलेश वानखेडे | Updated: May 23, 2025 20:11 IST2025-05-23T20:09:25+5:302025-05-23T20:11:24+5:30

नागपुरात शुक्रवारी आयोजित पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात बोलताना आत्राम यांनी आपला संपात व्यक्त केला. 

'BJP tried to overthrow me', Dharmarababa Atram openly alleges at NCP rally | 'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप

'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप

कमलेश वानखेडे, नागपूर
विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले. माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजप व काँग्रेसकडून मदत केली गेली. निवडणुकीत पैसे पुरवले गेले. मात्र तरी मी निवडून आलो, असा उघड आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते माजी मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी केला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नागपुरात शुक्रवारी आयोजित पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात बोलताना आत्राम यांनी आपला संताप व्यक्त केला. 

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, 'आता स्थानिक स्वराज्य स्थंस्थेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडे जागेची भीक मागायची नाही. कोणाच्या कुबड्या घेऊन चालायचे नाही. गडचिरोली जिल्ह्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.'

'मी कोणाचे ऐकणारही नाही. पक्ष आमच्या सोबत असेल, स्वबळावर गडचिरोलीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्ता आणली जाईल', ठाम अशी भूमिका मांडत आत्राम यांनी भाजपला उघड इशाराही दिला.

Web Title: 'BJP tried to overthrow me', Dharmarababa Atram openly alleges at NCP rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.