शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोट्यवधींचा सराफा व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:11 IST

नागपूर : हॉलमार्किंगनंतर दागिन्यांवर एचयुआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) घेणे अनिवार्य केल्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये रोष पसरला आहे. त्यांच्या मते ...

नागपूर : हॉलमार्किंगनंतर दागिन्यांवर एचयुआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) घेणे अनिवार्य केल्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये रोष पसरला आहे. त्यांच्या मते ही नवी हॉलमार्किंगची प्रक्रिया ग्राहकांसाठी प्रतिकूल आणि व्यवसायाच्या विरोधात आहे. अशा स्थितीत देशभरातील सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून एचयुआयडीला कडाडून विरोध दर्शविला.

एचयुआयडी विरुद्ध नागपूरसह विदर्भातील सराफा दुकाने बंद होती. यामुळे १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाला. यावेळी इतवारीच्या सराफा बाजारात धर्मकाट्याजवळ सराफा व्यापाऱ्यांनी एचयुआयडी प्रक्रिया हटविण्यासाठी निदर्शने केली. यावेळी नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले की, विदर्भात १० हजार आणि नागपुरात ३ हजार लहान-मोठे सराफा प्रतिष्ठाने आहेत. एचयुआयडीची सक्ती केल्यामुळे ९० टक्के दुकाने बंद होण्याची शंका आहे. एचयुआयडीवर अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया किचकट आणि खूप वेळ खाणारी आहे. यात दागिन्यांवर सहा आकड्यांचा डिजिटल कोड टाकावा लागतो. त्यानंतर कोड बीआयएस पोर्टलवर अपलोड करावा लागतो. बीआयएसच्या हॉलमार्किंग सेंटरची संख्या खूप कमी असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत खूप वेळ लागत आहे. यामुळे आगामी सणात दागिन्यांचा तुटवडा जाणवणार असून व्यवसायावर वाईट परिणाम होणार आहे. असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात पाच ते सहा हॉलमार्किंग सेंटर सुरु झाल्यानंतर एचयुआयडीची प्रक्रिया लागू करण्याची मागणी सराफा व्यापाऱ्यांनी केंद्र शासनाला केली होती. परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आंदोलनात विशाल पारेख, राजेश काटकोरिया, रविकांत हरडे, अशोक बखाई, भरत सेठ, चेतन वस्तानी, ललित कोठारी यांच्यासह सराफा व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.............

दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडणार

‘सराफा व्यवसायात सर्वाधिक पारदर्शकता ठेवल्यानंतरही एचयुआयडीची प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. या विरुद्ध झालेल्या आंदोलनाची केंद्र शासनाने दखल न घेतल्यास सराफा व्यावसायिक तीव्र आंदोलन करणार आहेत. बंद ठेवण्यासह इतर पर्यायही उपलब्ध आहेत.’

-राजेश रोकडे, सचिव, नागपूर सराफा असोसिएशन

...............