शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अपयश असल्यावर नेत्यांच्या आरत्या करायच्या का?, अंबादास दानवे यांची टीका

By कमलेश वानखेडे | Updated: September 26, 2023 13:49 IST

नागपुरातील पूरग्रस्त भागांची केली पाहणी

नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळी नागपुरातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, मोठया घराचा पोकळ वासा अशी म्हण आहे. मोठे नेते असताना विकास झाला नाही, मुंबईला तुंबई म्हणणारे, आता कुठे आहेत. मुंबई तर १ हजार मिलीमीटर पावसाला समोर गेली आहे. नागपुरात २०० ते ५०० मिमी पाऊस झाला तर काय होईल, याचा विचार राजकीय नेत्यांनी केला नाही. नागपूरची पूरस्थितीत हे राजकीय अपयश असल्यावर नेत्यांच्या आरत्या करायच्या का, अशी टीकाही त्यांनी केली.

दानवे यांनी अंबाझरी, डागा ले-आऊट, वर्मा लेआऊट, पंचशील चौक, सीताबर्डी यासह नागनदीच्या पात्राचीही पाहणी केली. काही घरांमध्ये जावून तेथील नुकसानीची माहिती घेतली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, मुंबईतील नाले सफाईवर येथील नेते ओरडतात, पण नागपूरचे काय, येथे नालेसफाई झाली का, संरक्षण भिंत का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. डागा ले आउटमध्ये पार्किंगच्या नावाखाली, नाल्यावर आच्छादन टाकले आहे, नासुप्रने हा खर्च कुणासाठी केला होता. वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. आता ५५ टीम सर्वेक्षण करीत आहेत. हे सर्वेक्षण वार्ड नुसार व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. कोणत्याही शिवसैनिकांने नेत्यांच्या कुटुंबियांवर टीका करू नये, कोणी शिवसैनिक करत असेल तर मी थांबवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दानवे यांच्यासोबत माजी आ. दुष्यंत चतुर्वेदी,  माजी खा. प्रकाश जाधव, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, नितीन तिवारी, दीपक कापसे, सतीश हरडे आदी उपस्थित होते.

अध्यक्ष सुनावणी घेण्यापूर्वी कुणाला भेटले ?

- अध्यक्ष हे न्यायाधीकरण आहे ते प्राधिकरण नाही. अपात्रे संदर्भात जो कायदा आहे त्याचा अर्थ लावण्याचे काम विधानसभा अध्यक्षांना करायचे आहे. जो अर्थ लावायचा असेल तो अर्थ त्यांनी लावावा. आमची जबरदस्ती नाही. पण अध्यक्ष हे सुनावाणी घेण्यापूर्वी कोणाला भेटले, त्यांच्याव कुणाचा दबाव आहे का, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतलीच पाहिजे, असेही दानवे म्हणाले. लवकरात लवकर निर्णय घ्या, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आणि निर्देश असताना अद्याप निकालाच्या सुनावणीला सुरुवात झाली नाही. प्रोसेस कशी करायची यातच विधानसभा अध्यक्ष गुंतलेले असल्यामुळे यातच सगळे राजकारण गुंतलेले आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAmbadas Danweyअंबादास दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरfloodपूरRainपाऊस