पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:24 IST2025-06-29T11:23:38+5:302025-06-29T11:24:14+5:30

Yugendra Pawar- Tanishka Engagement: शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचा त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट केला आहे.

Yugendra Pawar- Tanishka Engagement: Two weddings in the Sharad Pawar, Ajit pawar family this year! Yugendra Pawar's engagement, Supriya Sule revealed the name of her future daughter-in-law... | पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...

पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...

राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या पवार कुटुंबामध्ये यंदा दोन विवाहसोहळे पार पडणार आहेत. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा एप्रिलमध्ये संपन्न झाला होता. आता अजित पवार यांच्याविरोधात लढणारे त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांचेही लग्न ठरले आहे. 

शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचा त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट केला आहे. युगेंद्र आणि तनिष्का यांचा साखरपुडा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या फोटोत तनिष्का ही युगेंद्र पवार यांच्यासोबत बोटातील अंगठी दाखविताना दिसत आहे.  

सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे - माझा भाचा युगेनचा साखरपुडा तनिष्काशी झाला आहे! त्यांना आयुष्यभर प्रेम, हास्य आणि एकत्र राहावे अशी शुभेच्छा. कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी इन्स्टावर केली आहे. 


राजकीय वाटा वेगळ्या झालेल्या असल्या तरी पवार कुटुंबीय कौंटुबिक कार्यक्रमांना एकत्र येत असतात. आता पवार कुटुंबात एकाच वर्षी दोन विवाहसोहळे पार पडणार आहेत. यामुळे या दोन्ही सोहळ्यांना दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकत्र दिसणार आहे. 

 

Web Title: Yugendra Pawar- Tanishka Engagement: Two weddings in the Sharad Pawar, Ajit pawar family this year! Yugendra Pawar's engagement, Supriya Sule revealed the name of her future daughter-in-law...