शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या तरुणीची माघार; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:46 IST

तरुणीने मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावरही आराेप करण्यात आले हाेते. तिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप भाजप नेते कृष्णा हेगडे व त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी केला.

मुंबई : कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आराेप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारण तसेच या तक्रारीमुळे होत असलेल्या राजकारणामुळे माघार घेत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. शुक्रवारी याबाबत ट्विट करून त्यात मुंडे यांच्याविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचे तिने नमूद केले.तरुणीने मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावरही आराेप करण्यात आले हाेते. तिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप भाजप नेते कृष्णा हेगडे व त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी केला. याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे तक्रार अर्जही दिला हाेता, तर गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रारदार तरुणीविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तरुणी मुंडे यांना अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे मुंडे हे तणावात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.तत्पूर्वी १५ एप्रिल, २०१९ रोजी तक्रारदार तरुणीने नामांकित विमान कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या रिझवान कुरेशी यांच्याकडेही शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी अंबोली पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून, तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते असे ट्विट तिने केले होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी ट्विट करून तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले.माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न -माझी बहीण आणि मुंडे यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यात कोर्ट प्रकरण सुरू असल्याने मानसिक ताण आणि दबाव वाढला. मुंडे यांच्याविरोधात गेल्यानंतर मी राजकीय षडयंत्राची शिकार होत असून, काही जण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधत असल्याचे लक्षात आले. हे सगळे चुकीचे आहे. मी माझ्या घरातील कुठल्याही व्यक्तीचे नाव अशाप्रकारे खराब होऊ देणार नाही. मुंडे यांच्याविरोधात केेलेली तक्रार मी मागे घेत आहे.त्यांच्याविरोधात कुठलीच तक्रार करणार नाही. तसेच बलात्काराचीही तक्रार नाही. त्याबाबतचे कुठलेच व्हिडीओ, फोटो माझ्याकडे नाहीत. तक्रार मागे घेण्याबाबत कुठलाही दबाव नाही, असे तिने ट्विटमध्ये नमूद केले आहे. हे तर राजकारणातील पहिले ‘मी टू’ प्रकरण कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी हे राजकारणातील पहिले  ‘मी टू’ प्रकरण असल्याचे सांगितले. यावर वेळीच रोख बसणे गरजेचे असून, अखेर सत्याचाच विजय झाल्याचे मत त्यांनी मांडले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसBJPभाजपा