शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:19 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व कागदपत्रे देऊन गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे. दर आठवड्याला त्यांना स्मरण पत्र पाठविणार आहे, असे उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

मुंबई : गृह राज्यमंत्री योगेश कदमांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या कांदिवली येथील सावली बारमध्ये सर्व नियम पायदळी तुडवून बारबाला नाचविल्या जात होत्या. दोन वेळा बारवर कारवाई होऊनही त्यांनी कोणतेही पावले उचलली नसल्यामुळे त्यांची थेट जबाबदारी सिद्ध होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व कागदपत्रे देऊन गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे. दर आठवड्याला त्यांना स्मरण पत्र पाठविणार आहे, असे उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

गृह राज्यमंत्री कदमांनी आईच्या नावे डान्सबार असल्याचे मान्य केले. यापूर्वी कारवाई झाली तेव्हा काही गैरप्रकार होत असल्याचे त्यांना माहीत नव्हते का? तो बार चालवायला दिला असे ते म्हणतात. पण, कायद्यानुसार प्राधिकृत व्यक्ती जबाबदार असला तरी हे कृत्य मी केले असे परवानाधारकावर बंधनकारक आहे. प्राधिकृत व्यक्तीला त्या गोष्टी करण्यापासून परावृत्त केल्याचे सिद्ध करावे लागते. मात्र, कदम पितापुत्रांनी असे काही केले नाही. माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाल्याने ती खोटी असू शकत नाही, असा दावाही परब यांनी केला.

हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार : रामदास कदममंत्र्यांना ३५ ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. राज्यमंत्री कदम सभागृहात नसताना हे आरोप केले. नियमबाह्य पद्धतीने हे आरोप करण्यात आले आहेत. दोन दिवस सुट्टी असल्याने बुधवारी २३ जुलैला त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात येणार आहे. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा घेऊन दाखवावा. पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे द्या. आम्ही कोणाकडे मांडवली केली हे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान रामदास कदम यांनी दिले.

टप्प्याटप्प्याने प्रकरणे बाहेर काढण्याचा इशारा पोलिसांच्या रेकॉर्डप्रमाणे नृत्य करताना, लगट करताना व पैसे उधळतानाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे सिद्ध करण्यासारखे काही राहिले नाही. गृहराज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत डान्स बारवर रेड टाकतात. अश्लीलता व समाज विधायक कृती आहे म्हणून ते चांगले काम करतात. पण, स्वतःच्या आईच्या नावाने असलेल्या बारवर कोण कारवाई करणार? प्रदूषण मंडळात किती रेड झाल्या? त्याचे पुढे काय झाले? अशी कदम पितापुत्रांची अनेक प्रकरणे टप्प्या टप्प्याने बाहेर काढणार आहे, असा इशारा आ. परब यांनी दिला.

टॅग्स :Yogesh Kadamयोगेश कदमAnil Parabअनिल परबMaharashtraमहाराष्ट्र