शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची गाडी रुळावर येईल?

By admin | Updated: February 25, 2015 01:49 IST

विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी रेल्वेची भूमिका भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आजवरच्या सरकारने विविध प्रकल्पांच्या घोषणा केल्या

नागपूर : विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी रेल्वेची भूमिका भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आजवरच्या सरकारने विविध प्रकल्पांच्या घोषणा केल्या असल्या तरी येथील विकासाची गाडी अद्यापही ट्रॅकवर आलेली नाही. सात वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा केलेले प्रकल्प अद्यापही कागदावरच असून, किमान या अर्थसंकल्पात तरी या प्रकल्पांना ‘बुस्ट’ मिळेल, अशी अपेक्षा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.२०१०-११मध्ये बडनेरा येथे वॅगन वर्कशॉपचा प्रकल्प जाहीर झाला. हा प्रकल्प झाल्यास त्या भागात सुट्या भागांचे पर्यायी उद्योग उभे राहून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु हा प्रकल्पही रखडला. अजनी येथे मेकॅनाईज्ड लाँड्रीची घोषणा २०१२-१३मध्ये झाली. यामुळे प्रवाशांना स्वच्छ बेडरोल मिळणार असून, लाँड्रीमध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. रेल्वेच्या प्रवाशांना स्वस्त दरात पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने २०१२-१३मध्ये नीर बॉटलिंग प्लान्टची घोषणा झाली. त्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या वतीने बुटीबोरी येथे जागेची पाहणीही केली. परंतु या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या मेडिकल कॉलेजची घोषणाही हवेतच विरली. प्रत्यक्षात हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. याशिवाय मुंबईसाठी आणखी रेल्वेगाडी, पुण्याच्या रेल्वेगाड्या ‘डेली’ करण्याची तसेच नागपुरातून दिल्ली दुरांतो सुरू होण्याची अपेक्षा मोदी सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड थंडबस्त्यात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००८-०९मध्ये घोषणा केलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० किलोमीटर प्रकल्पाची किंमत ६९७ कोटी रुपये होती. ती १६०० कोटींवर गेली आहे. प्रकल्पासाठी हवा तसा निधीचा पुरवठा न झाल्यामुळे हा प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. ६ वर्षांत ३३ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली.