शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात सत्ता कुणाची, सस्पेन्स वाढला; उद्धवसेना तटस्थ राहिल्यास गणित कोलमडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 07:23 IST

भाजपचा व्हीप, काँग्रेसची धावपळ, महापौरपदासाठी उद्धवसेना ठाम

चंद्रपूर - महापौरपदासाठी मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीआधीच भाजपाने उमेदवार संगीता खांडेकर यांच्यासाठी सोमवारी व्हिप जारी केला. त्याचवेळी काँग्रेसकडून उद्धवसेनेला सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू असून, उद्धवसेना महापौरपदावर ठाम आहे.

उद्धवसेना तटस्थ राहिल्यास गणित कोलमडणार?

उद्धवसेनेचा दावा आहे की स्वतःचे ६, वंचितचे २ आणि २ अपक्ष असे १० नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत. एमआयएमचा १ नगरसेवक साथ देऊ शकतो. म्हणजेच एकूण ११. मात्र एवढ्या संख्येवर महापौरपद मिळवणे अशक्यप्राय मानले जात आहे.

इचलकरंजी, जालन्याचे  पहिले महापौर भाजपचे, बिनविरोध झाली निवड

इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंदा धातुंडे यांची, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल देवकरण डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली. शिव-शाहू विकास आघाडीने दोन्ही पदांसाठीची उमेदवारी मागे घेतली. महानगरपालिका सभागृहामध्ये भाजप महायुतीकडे ४७ सदस्य, तर विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडे १७ व उद्धवसेनेचा १ नगरसेवक होता. निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी शिव-शाहू विकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केली होती. 

लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा; जयश्री सोनकांबळे महापौर

लातूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा पेच अखेर सुटला असून, काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची महापौरपदी, तर ॲड. स्नेहल उटगे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार मागे घेतल्याने या निवडीचा मार्ग मोकळा झाला.  काँग्रेसचे ४३ आणि वंचितचे ४ उमेदवार निवडून आल्याने या युतीचे सभागृहात स्पष्ट बहुमत होते. मात्र, सत्तेत योग्य वाटा मिळावा, यासाठी ‘वंचित’ने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पुढील अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतले. 

वंदना मगरे जालनाच्या पहिल्या महापौर

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून भाजपच्या वंदना मगरे, तर उपमहापौर म्हणून राजेश राऊत यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. 

पुण्याच्या महापौरपदी नागपुरे; वाडेकर उपमहापौर 

पुणे  महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि उपमहापौरपदी ‘रिपाइं’चे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.  महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असल्याने भाजप कोणत्या नगरसेविकेला महापौरपदावर संधी देणार याबाबत उत्सुकता होती. नागपुरे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Mayor Election Suspense: Uddhav Sena's Neutrality Could Shift Power

Web Summary : Chandrapur's mayoral election intensifies as BJP issues a whip. Congress woos Uddhav Sena, which insists on the position. Ichalkaranji, Jalna saw unopposed BJP mayors; Latur elected a Congress mayor. Pune chose BJP's Nagpure.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे