शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Uday Samant : सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 14:06 IST

Uday Samant : मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. 

Uday Samant : उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना शनिवारी (दि.१०) मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकले. त्यानंतर ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यानंतर रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. 

दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतल्याने पुढील राडा टळला. मात्र, या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. यावर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. ते म्हणाले, मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यावर सुपाऱ्या फेकल्या. सुरुवात कोणी केली? मला वाटतं मनसैनिकांनी प्रतिउत्तर दिले आहे.

अशी परिस्थिती कोणी निर्माण केली याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार केला पाहिजे. सुरुवातीला हे घडलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आली नसती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव केल्यानंतर ज्या हीन दर्जाने बोलले जात आहे, ते आम्ही सहन करत आहोत. शाब्दिक हल्ले समजू शकतो, पण त्यात महाराष्ट्रातील संस्कृती असली पाहिजे. राज ठाकरे यांनी त्यांच्या संघटनेसाठी केलेला दौरा होता त्याला डिस्टर्ब करायची गरज नव्हती. तसंच, मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. 

(ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड)

असा झाला राडा...उद्धव ठाकरे यांच्या मोटारींच्या ताफ्याने ठाण्यात प्रवेश करताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन येथे येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी रंगायतनच्या आवारात प्रवेश केला आणि घोषणाबाजी केली. मोटारीवर बांगड्या फेकल्या. काहींनी हातातील लोखंडी कडे फेकले. गाडीवर नारळही फेकण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने त्यामुळे कुणाला इजा झाली नाही. उद्धव यांच्या स्वागताकरिता लावलेले बॅनर व पोस्टर मनसैनिकांनी फाडले. सभेकरिता आलेल्या वाहनांच्या मनसैनिकांनी काचा फोडल्या. ठाकरेंच्या सभेकरिता जमलेले शिवसैनिक बाहेरील घटना कळताच रंगायतनच्या बाहेर आले. मनसैनिक व शिवसैनिक यांच्यात बाचाबाची, शिवीगाळ सुरू झाली.  मात्र, सुरक्षेकरिता असलेल्या पोलिसांनी हातात मनसेचे झेंडे घेतलेल्या व घोषणाबाजी करणाऱ्यांना झटपट पकडून पोलिसांच्या गाड्यांत कोंबल्याने आणखी टोकाचा राडा टळला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तामध्ये ठाकरे सभास्थळी दाखल झाले.

मनसेच्या ४४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखलबीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकल्याचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटले. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये राडा घालणाऱ्या मनसेच्या ४४ कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी आविनाथ जाधव यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली असल्याचा आरोप आहे.  पोलिसांनी दोन वेगवेगळे एफआयआर दाखल केले आहेत. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMNSमनसेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे