शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

एक वर्षात पाचव्यांदा नियम मोडल्यास गाडीची नोंदणी होणार रद्द; मोटार वाहन कायद्यात मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 20:14 IST

Wardha : रस्त्यांवरील वाढते अपघात आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंतचे सर्वांत कठोर पाऊल उचलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
रस्त्यांवरील वाढते अपघात आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंतचे सर्वांत कठोर पाऊल उचलले आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, आता वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांना रडारवर घेण्यात आले आहे. नव्या नियमानुसार, एका वर्षात पाच वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनाचे रजिस्ट्रेशन आणि चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) कायमस्वरूपी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

पाचव्या चुकीनंतर वाहनाची नोंदणी, परवाना रद्द

वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असेल तर चार वेळापर्यंत ताकीद आणि दंड ठोठावला जाईल. पण, पाचव्यांदा चूक केल्यास आरटीओकडून तुमचे लायसन्स आणि गाडीचा नंबर कायमचा बाद करण्यात येणार आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार

बरेच जण वाहतूक नियमांकडे कानाडोळा करतात. परंतु, नव्या नियमानुसार रस्ते सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. किरकोळ चूकही भविष्यात तुमच्या वाहनावर बंदी आणू शकते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन चांगलेच महागात पडणार आहे.

वाहनचालकाला अपिलाचीही संधी मिळणार

कारवाई करण्यापूर्वी चालकाची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. चालकाला वाटले की, कारवाई चुकीची आहे, तर त्याला वरिष्ठांकडे अपील करण्याचा अधिकार आहे.

...तर मात्र दंड भरावाच लागणार

अपिलाची संधी असली, तरी सीसीटीव्ही फुटेज किंवा डिजिटल पुराव्यावरून नियम मोडल्याचे स्पष्ट झाले, तर कोणतीही शिफारस किंवा विनंती मान्य केली जाणार नाही, अशा परिस्थितीत चालकाला विहीत दंड आणि कारवाईला सामोरे जावेच लागेल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

हजारो चालकांवर कारवाई

मागील वर्षभरात जिल्ह्यात अशा हजारो चालकांची नोंद झाली आहे. ज्यांनी वारंवार नियमांचे उल्लंघन केले आहे. या 'रिपिट ऑफेंडर्स'मुळेच अपघातांची तीव्रता वाढत असल्याचे समोर आले आहे. नव्या नियमामुळे अशा चालकांना चाप बसणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल

केंद्र सरकारने १९८९च्या मूळ कायद्यात सुधारणा करून प्रशासनाला अधिक अधिकार दिले आहेत. अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने कायद्यात बदल केला आहे.

चालान नंतर ४५ दिवसांचा ग्रेस पीरियड

नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी ४५ दिवसांचा वेळ दिला जाईल. या काळात दंड भरल्यास कायदेशीर गुंतागुंत टळू शकते.

"वाहन चालवताना शिस्त पाळणे हे केवळ कर्तव्य नसून ती गरज आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत तसेच नव्या मोटार वाहन कायद्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे."
- स्नेहा मेंढे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

English
हिंदी सारांश
Web Title : Vehicle registration canceled for repeat traffic offenders: New motor vehicle law.

Web Summary : Under the amended Motor Vehicle Act, repeated traffic violations will result in permanent vehicle registration and license cancellation. Five violations in a year can lead to this action after a warning and fine for the first four offenses. Drivers have the right to appeal.
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षाMaharashtraमहाराष्ट्र