शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

पुण्यासह राज्यातील तापमानात पुढील दोन दिवस वाढ राहणार कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 10:14 PM

मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे.

ठळक मुद्देमध्य भारत आणि पश्चिम बंगालच्या परिसरात जास्ता दाबाचे क्षेत्र तयार

पुणे :उत्तरेकडून येणारे वाऱ्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

याबाबत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात. त्यामुळे राज्यातील तापमानात घट होत असते. त्याप्रमाणे आताही उत्तरेकडील वारे दक्षिणेकडे येतील अशी अपेक्षा होती. परंतु, मध्य भारत आणि पश्चिम बंगालच्या परिसरात जास्ता दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे अजूनही दक्षिणेकडून वारे येत आहे. या वार्यांबरोबर पश्चिम बंगालच्या उपसागरावरुन येणारे बाष्पयुक्त वारेही असल्याने आपल्याकडे काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. याचा परिणाम जानेवारीमध्येही सकाळी जाणवणारी थंडीही कमी झाली आहे. रात्री फॅन लावावा लागत आहे. अजून किमान दोन दिवस ही परिस्थती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तरेकडील वार्यांचा जोर वाढल्यास आपल्याकडे थंडी परतण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तर किमान तापमान १८ ते २० अंशावर गेल्याने गरम कपडे गुंडाळून ठेवण्याची स्थिती सध्या आली आहे. राज्यात सर्व ठिकाणी कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेले दिसून येत आहे. हवामानातील या बदलामुळे या हंगामात राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता धुसर झाली आहे.

पुण्यात आज कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते २.९ अंशाने अधिक आहे. किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली ते सरासरीच्या तुलनेत ७.१ अंशाने अधिक आहे. पुढील दोन दिवसात त्यात घट होण्याची शक्यता असून २१ जानेवारी रोजी ते सरासरीइतके राहण्याची शक्यता आहे

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानTemperatureतापमान