पोलिसांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या - पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 05:03 IST2020-02-14T05:02:39+5:302020-02-14T05:03:12+5:30

गृहमंत्री अनिल देशमुख यांना लिहिले पत्र

Take care of the health of the police - Pawar | पोलिसांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या - पवार

पोलिसांच्या स्वास्थ्याची काळजी घ्या - पवार

मुंबई : सभा शांततेत सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना द्या, गृहविभागामार्फत तशी मुभा असावी असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.


राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौºयाप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्नांकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे. जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलिस कर्मचाºयांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात. सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवे, मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाºयांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो, असेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी देखील तिष्ठत राहणे उचित वाटत नाही, असेही शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.


सभा शांततेत सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाºयांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना द्या व गृह विभागामार्फत तशी मुभा असली पाहिजे, असेही शेवटी पत्रात शरद पवार यांनी म्हटले आहे.

Web Title: Take care of the health of the police - Pawar