शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

दक्षता घ्या, हृदयविकार टाळा!

By admin | Updated: September 26, 2016 02:44 IST

तरुणांमध्ये गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आता कोणत्याही वयोगटात होत

मुंबई: तरुणांमध्ये गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आता कोणत्याही वयोगटात होत असल्याने ही चिंतेची बाब झाल्याने उच्च रक्तदाब, आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यास ९० टक्क्यांनी मुधेमह होण्याचा धोका घटतो, असे मत मुंबईतील हृदयरोगतज्ज्ञांनी बॉम्बे रुग्णालयात आयोजित केलेल्या परिसंवादात व्यक्त केले. २९ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘हृदय दिना’निमित्त बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (ग्रेटर मुंबई) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुंबई शाखेच्या संयुक्त विद्यमाने हृदयविकारांवर परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिषदेत बॉम्बे रुग्णालयाचे महासंचालक आणि ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लेखा पाठक, डॉ. राजेंद्र त्रिवेदी, डॉ. अनिल शर्मा, डॉ. सुहास पिंगळे, डॉ. ब्रायन पिंटो, डॉ. आशिष नाबर डॉ. बी. सी. कलमठ सहभागी झाले होते. या परिषदेत एका ६५ वर्षीय महिला रुग्णाची अ‍ॅन्जिओप्लास्टीचे थेट प्रक्षेपण सभागृहात दाखवण्यात आले. हृदयविकार टाळणे अवघड नाही. मात्र, काही गोष्टी या नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी मधुमेह, रक्तदाब, एलडीएल कोलेस्ट्रॉल, मद्यपान आणि धूम्रपान नियंत्रणात ठेवल्यास हृदयविकाराचा धोका नव्वद टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते, असे मत डॉ. ब्रायन पिंटो यांनी व्यक्त केले. डॉ. बी. के. गोयल यांनी या परिषदेत, हृदयविकार उपचारांची सुरुवात कशी आणि कुठून झाली, या उपचारांमध्ये आलेली स्थित्यंतर, महत्त्वाचे टप्पे कोणते आणि त्याचा रुग्णांना कसा फायदा झाला, याविषयी माहिती दिली. हृदयविकार काही प्रमाणात अनुवंशिकही आहे. ज्यांच्या आई-वडिलांना ५५ वर्षांआधीच हृदयविकाराचा झटका आला असेल, अशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी नियमित आपली तपासणी करून घेतली पाहिजे, असे बॉम्बे रुग्णालयाचे हृदयरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. बी. सी. कलमठ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)