शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

तीन लिंग असलेल्या चिमुरड्यावर शस्त्रक्रिया

By admin | Updated: August 22, 2015 01:12 IST

दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील जन्मलेल्या बाळाला तीन लिंग आणि गुद्द्वाराची जागा बंद होती. उत्तर प्रदेशात त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत

मुंबई : दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील जन्मलेल्या बाळाला तीन लिंग आणि गुद्द्वाराची जागा बंद होती. उत्तर प्रदेशात त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्याला उपचारांसाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी या चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पुढच्या काही दिवसांतच हा चिमुरडा घरी परत जाणार आहे. या बाळाला जन्मल्यापासून पोटाला नळी लावून नैसर्गिक विधी केले जात होते. डॉ. कोठारी यांनी पुढे सांगितले, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुलाला रुग्णालयात तपासणीसाठी आणले. या वेळी उजवीकडच्या लिंगातून लघवी जात होती. पण, डावीकडच्या लिंगातून लघवी जात नव्हती; आणि खाली एक लिंग होते त्याची वाढ पूर्ण झालेली नव्हती. यानंतर गुद्द्वाराची जागा तपासल्यावर ती बंद असल्याचे अचूक निदान झाले. तिथे एक मांस, हाड, चरबी आणि त्वचेचा गोळा होता. या मुलावर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल सहा तास चालली. या शस्त्रक्रियेत मुलाचे उजव्या आणि डाव्या बाजूचे लिंग जोडण्यात आले. तर खालचे लिंग काढण्यात आले. याचवेळी गुद्द्वारापाशी असलेला मांसाचा गोळादेखील काढण्यात आला. आता या मुलाची प्रकृती स्थिर आहे. २५ आॅगस्ट रोजी पोटाच्या वरच्या बाजूची जागा बंद करण्यात येणार आहे. भारतात पहिल्यांदाच असे मूल जन्माला आले आहे. याला डेव्हलपमेंट अ‍ॅबनॉर्मलिटी म्हटले जाते. पोटात बाळाची वाढ होत असताना रक्तपुरवठा कमी झाला, त्यात आईने घेतलेल्या औषधांचा परिणाम गर्भावर झाला असण्याची शक्यता आहे. पण, याचे नेमके कारण सांगता येत नाही. मात्र, आता हे बाळ सामान्य आयुष्य जगू शकते, असे डॉ. कोठारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)