शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

दिरासोबत भांडण झालं म्हणून कुणी नवऱ्याला सोडतं का? सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 18:06 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. विधानसभेच्या इंदापूर मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत पेच निर्माण झाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी कमळ हातात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे. दिरासोबत भांडण झालं म्हणून कुणी नवऱ्याला सोडतं का अशी विचारणा त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात आक्रमक मोर्चेबांधणी केली होती. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर इंदापूर विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली. त्यावर तोडगा न निघाल्याने अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची वाट धरली. दरम्यान, काँग्रेसला दिलेल्या सोडचिठ्ठीवरून सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे. आहे. दिरासोबत भांडण झालं म्हणून कुणी नवऱ्याला सोडतं का, अशी विचारणा त्यांनी केली. हर्षवर्धन पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत भांडण होते. मग त्यांनी त्या रागातू काँग्रेस का सोडली, अशा रोखाने त्यांनी विचराणा केली. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण