शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांनी बनवलेल्या ‘प्रथम’चे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: September 26, 2016 09:28 IST

मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांनी तब्बल आठ वर्षे अथक परिश्रम घेऊन तयार केलेला ‘प्रथम’ या लघुउपग्रहाचे सोमवारी सकाळी ९ वाजता अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले.

मुंबई, दि. २६ - मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांनी तब्बल आठ वर्षे अथक परिश्रम घेऊन तयार केलेला ‘प्रथम’ या  लघुउपग्रहाचे सोमवारी सकाळी ९ वाजता अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रातून अंतराळात झेपावणाऱ्या ‘प्रथम’कडे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसह अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेला पहिला लघुउपग्रह असून, या लघुउपग्रहाचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधनात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या सप्तश्री बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर या विद्यार्थ्यांना जुलै २००७मध्ये ‘प्रथम’ची संकल्पना सुचली. त्यानुसार आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या विभागाने त्याची बांधणी सुरू केली. त्सुनामीसारख्या प्रलयाची पूर्वकल्पना देण्याची क्षमता ‘प्रथम’मध्ये आहे, असा दावा मुंबई आयआयटीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० किलो वजनाच्या या उपग्रहाचे इस्रोनेही कौतुक केले आहे.

इंडियन स्पेस रिसर्चने २००९मध्ये या लघुउपग्रहाबाबत करार केला. मात्र काही कारणास्तव या उपग्रहाच्या उड्डाणाला हिरवा कंदील मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात ‘प्रथम’मध्ये अनेक बदल करण्यात आले. सोमवारी अंतराळात उड्डाण केल्यानंतर हा लघुउपग्रह ४ महिने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. यातील २ महिन्यांत विद्यार्थी ‘प्रथम’ची अंतराळातील बाह्य चाचणी करतील. त्यातील त्रुटी टिपून नव्या प्रकल्पामध्ये बदल करण्यात येतील. हा लघुउपग्रह अंतराळात असताना भारतातील वातावरणाचा अभ्यास करेल, तसेच वातावरणातील बदल टिपेल.प्रकल्पाचे उद्दिष्ट आयआयटीसोबतच एरोस्पेस इंजिनीअरिंगची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम’ हक्काचे व्यासपीठ आहे. भविष्यात देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना एकत्र घेऊन प्रथमचे काम अखंड सुरू राहावे, हा या मागील हेतू आहे.‘प्रथम’चे उद्दिष्ट वातावरणातील बदल अभ्यासणे. इलेक्ट्रॉनचा अभ्यास करणे.अधिकाधिक विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची आवड निर्माण करणेअशी होते निवड आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये सप्टेंबरमध्ये ‘प्रथम’च्या नव्या टीमची निवड केली जाते. यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याशिवाय विद्यार्थ्यांना सादरीकरण करावे लागते. त्यातून विद्यार्थी निवडले जातात. दरवर्षी साधारणत: ३० विद्यार्थ्यांची टीम प्रथमसाठी काम करते.