"...तर वनमंत्री काय कामाचे?", शिंदेंना घेरणाऱ्या गणेश नाईकांवर निलेश राणे तुटून पडले; प्रश्नांचा वाचला पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:17 IST2026-02-16T13:16:24+5:302026-02-16T13:17:58+5:30

राज्याचे वन मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. नाईकांनी शिंदेंना घेरताच आमदार निलेश राणे यांनी तक्रारी आणि प्रश्नांचा पाढा वाचत पलटवार केला. 

"...So what is the use of the Forest Minister?", Nilesh Rane lashed out at Ganesh Naik who surrounded Shinde; Read the questions | "...तर वनमंत्री काय कामाचे?", शिंदेंना घेरणाऱ्या गणेश नाईकांवर निलेश राणे तुटून पडले; प्रश्नांचा वाचला पाढा

"...तर वनमंत्री काय कामाचे?", शिंदेंना घेरणाऱ्या गणेश नाईकांवर निलेश राणे तुटून पडले; प्रश्नांचा वाचला पाढा

ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी नगरविकास खात्यावर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरण्यास सुरूवात केली. नाईक आक्रमक झाल्यानंतर आता शिंदेसेनेकडून पलटवार करण्यास सुरूवात झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईकांना आव्हान दिले. शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनीही नाईकांना त्यांच्या खात्यातील कामांची आठवण करून देत पलटवार केला आहे. 

शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे म्हणाले, "मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो. कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे."

हे वनमंत्र्यांच्या परवानगीने सुरूये का?
 
"अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही. फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत. साधनसामुग्री नाही. DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही. लाकूडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय", असा सवाल करत निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या कामावरच शंका उपस्थित केली आहे.     

पुढे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे की, "वन राहिलीच नाहीत, तर वनमंत्री काय कामाचे?  जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले, तसे आता जंगल पोखरले जात आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही, ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत, पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत", अशा शब्दात निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या गणेश नाईकांवर पलटवार केला. 

श्रीकांत शिंदेंनी नाईकांविरोधात थोपटले दंड

"माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील महापालिकांमध्ये माझ्या शिवसेनेची सत्ता आहे. तुमच्या नवी मुंबई महापालिकेमध्ये आमच्या चुकांमुळे १० नगरसेवक कमी आले आहेत. तुम्ही एक महापालिका घेऊन कसल्या वल्गना करता. एकनाथ शिंदे यांच्या नादाला तुम्ही लागा, मात्र श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका. तुम्हाला खुमखुमी असेल, तर खुले आव्हान देतो. तुम्ही किंवा तुमचा मुलगा ठाणे, कल्याण कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून उभा राहून दाखवा. तुमची खुमखुमी हा श्रीकांत शिंदे पूर्ण करेल", असे आव्हान श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना दिले आहे. 

Web Title : वन मुद्दों पर राणे ने नाईक पर हमला किया, मंत्री की भूमिका पर सवाल।

Web Summary : नीलेश राणे ने वन मंत्री गणेश नाइक की वन कटाई और संसाधनों की कमी के बारे में आलोचना की। उन्होंने नाइक की प्रभावशीलता पर सवाल उठाया और वन प्रबंधन में महत्वपूर्ण मुद्दों को संबोधित करने के बजाय प्रचार को प्राथमिकता देने का आरोप लगाया। श्रीकांत शिंदे ने भी नाइक को चुनौती दी।

Web Title : Rane attacks Naik over forest issues, questions minister's role.

Web Summary : Nilesh Rane criticizes Forest Minister Ganesh Naik regarding deforestation and lack of resources. He questions Naik's effectiveness and accuses him of prioritizing publicity over addressing critical issues in forest management. Shrikant Shinde also challenged Naik.