शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चाळीतील कांद्याला येऊ लागला वास

By admin | Updated: September 25, 2016 18:26 IST

कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 25 - कांद्याला यंदा भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कांदा गेल्या अनेक दिवसांपासून चाळीत साठवणूक करून ठेवला आहे. मात्र, आता चाळीतील कांद्याला वास येऊ लागला आहे. पिंपळनेर शहरानजीकच्या ग्रामीण भागात तर तर साठवणूक केलेला कांदा सडला असून त्यातून पाणी बाहेर निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिल्लक असलेला कांदा मिळेल, त्या किंमतीत विकण्याची वेळ आली आहे. साक्री तालुक्याचे मुख्य पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. पण यंदा कांद्याने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेला कांदा चाळीत सडत आहे. तर जो काही शिल्लक राहिलेला कांदा आहे. त्या कांद्याला शेतकऱ्यांना फक्त १०० ते २०० रुपये क्विंटलप्रमाणे विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. साक्री तालुक्यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. सध्या कांद्याचा भाव पाहिला, तर शेतकऱ्यांची जणू चेष्टाच करण्याचा प्रकार सुरू आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने शेती करूनदेखील त्यांच्या कांद्याच्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने शेती करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. सडलेला कांदा फेकावा लागतोय कांद्याला यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून भाव नाही. त्यामुळे पुढे चांगला भाव मिळेल? या आशेने शेतकऱ्यांनी तब्बल पाच ते सहा महिन्यांपासून कांदा चाळीत साठवणूक करून ठेवला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून कांदा साठवणूक करून ठेवल्यामुळे कांदा सडत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यातून आता पाणी बाहेर पडत असून त्यातून वासही येत आहे. १ ते २ रुपये किलोप्रमाणे विक्री खराब कांदा चाळीत साठवून ठेवण्यापेक्षा मिळेल, त्या किंमतीत शेतकऱ्यांनी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पिंपळनेरशहरासह लगतच्या ग्रामीण भागात कांदा चक्क १ ते २ रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. तर साक्री व धुळे शहरात कांदा ५ ते १० रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. >सरकारने शेतकऱ्यांकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कांदा सडत चालल्यामुळे येईल, त्या किंमतीत कांद्याची विक्री आम्हांला करावी लागत आहे. - मयूर घरटे, सामोडे, शेतकरी>सरकारने कांदा निर्यात केली असती, तर शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला असता. पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिले नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - शशिकांत भदाणे, माजी अध्यक्ष, शेतकरी संघटना